Vikram Bhatt reaction on ex-girlfriend Sushmita Sen's relationship with Lalit Modi Google
मनोरंजन

Sushmita Sen: 'Ex' विक्रम भट्टनं तोडली चुप्पी, म्हणाले,'तिची भूक तर...'

ललित मोदीनं सुश्मिता सेन सोबतचं आपलं नातं जगजाहिर केल्यानंतर सोशल मीडिवर सुश्मिताला 'गोल्ड डिगर' म्हणून हिणवलं जात आहे.

प्रणाली मोरे

जेव्हापासून सुश्मिता सेन(Sushmita Sen) ललित मोदीला(Lalit Modi) डेट करत आहे ही गोष्ट समोर आली तेव्हापासून अनेकांनी अभिनेत्रीवर ताशेरे ओढले आहेत. कोणी तिला 'गोल्ड डिगर' म्हणत आहे तर कोणी त्यांच्यातील वयाच्या अंतरावरनं तिला फटकारतंय. सुश्मिता सेन आणि ललित मोदी या दोघांनीही ट्रोलरवर चांगलाच पलटवार केला आहे. सुश्मिता सेनला गोल्ड डिगर म्हटल्यानं प्रियंका चोप्रा देखील नाराज झाली आहे. आता सुश्निता सेनचा एक्स-बॉयफ्रेंड दिग्दर्शक विक्रम भट्टची(Vikram Bhatt) यावर प्रतिक्रिया आलेली आहे. विक्रम भट्टने सुश्मिता सेनला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांवर नाराजगी व्यक्त केली आहे. विक्रम भट्ट म्हणाले आहेत, ''सुश्मिता कोणत्याही पुरुषाच्या प्रेमात पडण्याआधी त्याचा बॅंक बॅलन्स चेक करणारी स्त्री नाही. ती गोल्ड डिगर नाही लव्ह डिगर आहे,तिला प्रेमाची भूक आहे''.(Vikram Bhatt reaction on ex-girlfriend Sushmita Sen's relationship with Lalit Modi)

विक्रम भट्ट आणि सुश्मिता सेनने जवळपास २ वर्ष एकमेकांना डेट केलं. परंतु १९९६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले, विक्रम भट्टनंतर सुश्मिता सेनच्या आयुष्यात खुप जणं आली.पण कोणासोबतही तिचं नातं जास्त काळ टिकलं नाही. विक्रम भट्ट सोबतही तिचं नातं कमी काळासाठीच टिकलं,पण तरिही ते सुश्मिता खूप चांगली माणूस असल्याचं सांगतात. विक्रम भट्टचे म्हणणे आहे की सुश्मिता पैशांच्या बाबतीत हव्यास असलेली स्त्री नाही.

विक्रम भट्टने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता सेन-ललित मोदीचं नातं आणि अभिनेत्रीला गोल्ड डिगर म्हणून ट्रोलर्सनी हिणवल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम भट्ट म्हणाले,''सुश्मिता सेन अशी स्त्री नाही जी कोणा पुरुषाच्या प्रेमात पडण्याआधी त्याचा बॅक बॅलन्स पाहील. जेव्हा सुश्मिताला माझ्यासोबत प्रेम झाले तेव्हा माझ्याकडे एक रुपया देखील बॅलन्स नव्हता. मी 'गुलाम' सिनेमा दिग्दर्शित करत होतो,पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी तो दिवस विसरणार नाही जेव्हा सुश्मिता मला पहिल्यांदा अमेरिकेला घेऊन गेली आणि तिनेच त्या ट्रिपवर माझादेखील खर्च केला होता. माझ्याकडे त्यावेळी पैसे नव्हते, जेव्हा मी लॉस एंजेलिसला पोहोचलो तेव्हा तिथे मी Limousine पाहिली आणि हैराण झालो. तेव्हा सुश्मिता म्हणाली ,मला तुझी युएस मधील एन्ट्री स्पेशल बनवायची होती''.

विक्रम भट्ट पुढे म्हणाले,''सुश्मिता लव डिगर आहे,गोल्ड डिगर मुळीच नाही. तिला पैशाची नाही,तर प्रेमाची भूक आहे. मला असं वाटतं की लोकांच्या आयुष्याची खिल्ली उडवायची हा आता एंटरटेन्मेंटचा भाग झाला आहे. एका व्यक्तीचं दुःख दुसऱ्या व्यक्तीसाठी आनंद देणारं ठरतंय. जेव्हा करिनाने सैफसोबत लग्न केलं तेव्हा देखील तिला ट्रोल केलं गेलं होतं. जर तुम्ही सेलिब्रिटी असाल आणि काही निर्णय घेतला असेल जो लोकांना फनी वाटत असेल तर ते लगेच ट्रोल करायला सुरुवात करतात''.

बिझनेसमन आणि माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदीने तीन-चार दिवसांपूर्वी सुश्मिता सेनसोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर करत त्यांच्या दोघांमधील नातं अधिकृतरित्या जाहीर केलं होतं. ललित मोदी १० वर्षांनी सुश्मितापेक्षा मोठे आहेत. सुश्मिताचे काही महिने आधीच रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाले आहे. यामुळे सुश्मिता सेन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. तिला चक्क गोल्ड डिगर म्हणून हिणवलं जात आहे. सुश्मिता सेनने पोस्ट करत गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे. अभिनेत्री म्हणाली आहे की, मला कायम गोल्ड नाही तर हिऱ्यांचीच प्रतिक्षा राहिली आहे. मला हिरा खूप आवडतो. मी स्वतःच्या पैशानेच तो विकत घेते. आणि मी अशा ट्रोलिंगला काडीचीही किंमत देत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT