Maldives Row: सध्या देशात मालदीव हे ठिकाण खुपच चर्चेत आलं आहे. अचानक बॉयकॉट मालदीव हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. केवळ सामान्य लोकच नाही तर भारतीय सेलिब्रिटींनीही मालदीववर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी केली.
हे प्रकरण सुरु झालं ते मालदीवच्या एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर. यानंतर हे प्रकरण तापले आहे. नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटाचे फोटो शेयर करत लक्षद्वीपमधील पर्यटन वाढण्याचे आवाहन केले.
बॉलिवूड कलाकार आता चाहत्यांना मालदीवमध्ये सुट्टी घालवण्याऐवजी लक्षद्वीपसारख्या भारतीय बेटांना भेट देण्याचा सल्ला देत आहेत. यामध्ये अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर आणि इतर अनेक स्टार्सचा समावेश आहे.
मात्र आता अभिनेता आणि एमी अवॉर्ड विजेता वीर दासनेही मालदीवविरुद्ध स्टार्सने दिलेल्या प्रतिक्रियेची खिल्ली उडवली आहे.
वीर दासने भारतीय लोक आणि सेलिब्रिटींबद्दल पोस्ट करत आता मालदीवला सुट्टी घालवून आलेले लोक फोटो टाकण्यासाठी घाबरत असल्याचे सांगितले आहे.
त्याने पोस्ट केले, 'सर्वप्रथम मला आनंद आहे की लक्षद्वीपला इतक प्रेम मिळत आहे! तर दुसरीकडे, आत्ता कुठेतरी मालदीवमध्ये काही भारतीय सेलिब्रिटी, ज्यानी दोन आठवडे कार्बोहायड्रेट खाल्लेले नाही, त्यांनी सुट्टीत सर्वोत्तम फोटो काढली आहेत आणि ते आता फोटो पोस्ट करायला घाबरले आहेत'
वीर दासची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याने मालदीवबद्दल बोलणाऱ्या स्टार्सची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोलही केले आहे. तर अनेकांनी त्याचे समर्थनही केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.