Virat Kohli 50 century IND vs NZ Semi Final esakal
मनोरंजन

Virat Kohli 50th century : फ्लाईंग किस अन् आनंदाश्रू ! सचिनचा विक्रम मोडल्यावर असं केलं अनुष्काने विराटचं कौतुक

विराटनं उपस्थित हजारो प्रेक्षकांना अन् चाहत्यांना जिंकून घेतले आहे.

युगंधर ताजणे

Virat Kohli 50 century IND vs NZ Semi Final : किक्रेटचा देव म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये जो ४९ शतकांचा विक्रम आहे तो भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं मोडला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध न्युझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगतो आहे. त्यात विराटनं उपस्थित हजारो प्रेक्षकांना अन् चाहत्यांना जिंकून घेतले आहे.

वानखेडे स्टेडियमवर जोरदार दिवाळी साजरी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे विराटचं पन्नासावे शतक. गेल्या अनेक दिवसांपासून विराटच्या त्या शतकाची अपेक्षा होती. अखेर भाऊबीजेच्या दिवशी विराटनं त्या मोठ्या विक्रमाला गवसणी घालत सचिनला हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत अभिवादन केले आहे. या सगळ्यात चर्चा रंगली ती अनुष्काच्या प्रतिक्रियेची.

इतक्या लहान मुलांना फटाके वाजवायचे नसतात हे कसं समजवायचं?

विराटनं शतक झाल्यावर प्रेक्षकांना बॅट दाखवून त्यांच्या अभिवादनाचा स्विकार करत असताना अनुष्काकडे पाहिले अन् हजारो चाहत्यांनी एकच गजर केला. अनुष्कानं त्याच्याकडे पाहत फ्लाईंग किसचा वर्षाव केला. त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही कौतुकास्पद आहे. विराटनं बाद झाल्यानंतर देखील अनुष्काकडे पाहत तिच्या शुभेच्छांचा स्विकार केल्याचे व्हिडिओ लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करत तब्बल ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. हे आव्हान आता न्युझीलंडला अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी पार करावे लागणार आहे. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी केलेली जोरदार सुरुवात याच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली आहे. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या खेळीचाही मोठ्या धावसंख्येत मोलाचा वाटा आहे.

विराटनं त्याच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, एका महान फलंदाजानं माझं कौतुक केलं याचं मला अप्रुप आहे. त्याचा मी आदरच करतो. माझ्या या खेळीचे श्रेय श्रेयस अय्यरला जाते. याचबरोबर रोहित, गिल यांनी देखील चांगली सुरुवात करुन दिली. ही एक सांघिक कामगिरी होती. असे विराटनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT