Vivek Agnihotri On Naseeruddin Shah : प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स या चित्रपटाची गेल्या वर्षी खूपच चर्चा झाली होती. त्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही दिला होता. विविध पुरस्कारही या चित्रपटाला मिळाले होते. जेवढं कौतुक वाट्याला आलं तेवढीच टीकाही अग्निहोत्री यांना सहन करावी लागली होती.
यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी सनीचा गदर २ आणि अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सवर जोरदार टीका केली आहे. या चित्रपटांना यश कसे मिळते किंवा हा चित्रपट पाहण्यासाठी लोकं गर्दी का करतात असा प्रश्न शहा यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन अग्निहोत्री यांनी देखील शहा यांना सणसणीत उत्तर दिले आहे.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
अग्निहोत्री यांनी नसिरुद्दीन शहा यांच्याविषयी म्हटले आहे की, काही माणसं ही त्यांच्या आयुष्यात नेहमीच दु:खी असतात. त्यांना नेहमीच नकारात्मक गोष्टी, घटना आठवतात. त्याविषयी बोलायला आवडते. नसीरभाईला नेमके काय आवडते हे त्यांचे त्यांना माहिती. मी त्यांच्या अभिनयाचा चाहता आहे. आणि मी त्यांना ताश्कंद फाईल्समध्ये पाहिले आहे. ते आमच्या प्रोजेक्टचा भागही होते. मला वाटतं ते खूपच म्हातारे झाले आहेत. किंवा ते आयुष्याविषयी त्यांची नकारात्मता वाढत चालली आहे.
नसिरुद्धीन शहा यांना काय प्रॉब्लेम होता.... विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले की, मला माहिती नाही की, नसिरुद्धीन शहा यांना माझ्या द काश्मिर फाईल्सचा काय प्रॉब्लेम होता. मी जे आहे ते प्रामाणिकपणे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. देशभर त्याची मोठ्या संवेदनशीलपणे दखल घेण्यात आली होती. त्यावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला बॉक्सऑफिसवर त्याला एवढा प्रतिसाद मिळाला त्याविषयी शहा नाराजी व्यक्त करतात.
कश्मिरच्या खोऱ्यात जे काही झाले त्या संहारावर शहा हे पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे की काय हे कळत नाही. मग त्यांनी सांगावे हे जे झाले ते सगळेच खोटे आहे म्हणून. ते एक बुद्धिमान अभिनेते आहेत. आणि जो नरसंहार झाला त्याचे ते समर्थन करतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना काय बोलावे हेच मला कळत नाही. माझ्याकडे त्यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्दच नाहीत.
काश्मिर फाईल्सविषयी बोलायचे झाल्या या चित्रपटाला ६९ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारामध्ये राष्ट्रीय एकता विषयावर बेस्ट फिचर फिल्मचा नरगिस दत्त पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटावर वेगवेगळ्या माध्यमातून टीकाही झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.