Vivek Agnihotri Faiz Ahmad Faiz poem in The Kashmir : द काश्मिर फाईल्स चित्रपट आणि त्या चित्रपटावरुन झालेला वाद हा सगळ्यांना माहिती आहे. देशात या चित्रपटानं वेगळ्याच वादाला सुरुवात झाली होती. दोनशे कोटीहून अधिक व्यवसाय या चित्रपटानं केला होता. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सध्या सोशल मीडियावर शेयर केलेलं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेला हल्ला, त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक याची जगभरामध्ये चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान इम्रान खान यांनी आपण निर्दोष असून विरोधकांनी खोटे आरोप करुन आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. आपण लवकरच निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन येऊ. आणि पाकिस्तानच्या जनतेला आश्वस्त करु अशी प्रतिक्रिया खान यांनी दिली होती.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
सोशल मीडियावर इम्रान खान यांचा निषेध करणारे व्हिडिओ, पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र एका व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो व्हिडिओ पाकिस्तानातील आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तो शेयर केला होता. त्यामध्ये त्यांनी फैज अहमद फैज यांच्या कविता पोस्ट केली आहे. त्या कवितेचा व्हिडिओ मात्र आपल्या कश्मिर फाईल्स या चित्रपटातील असल्याचे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.
अग्निहोत्री यांनी तो व्हिडिओ ट्विटवर शेयर केला आहे. आणि तो इम्रान खान यांना टॅगही केला आहे. त्यात ते म्हणतात, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील भारतीय गाण्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. ही भारतीय चित्रपटांची ताकद आहे. जिथे द काश्मिर फाईल्सचे गाणे पाकिस्तानात अनाधिकृतपणे लावले जात आहे. याला आपण दुसरे काय म्हणणार, असा प्रश्न अग्निहोत्री यांनी इम्रान खान यांना विचारला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.