अभिनेत्री दिया मिर्झा(Dia Mirza) हिच्या एका पोस्टमधील वक्तव्यावरुन 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) यांनी तिला खोचक बोल सुनावले आहेत. दियानं त्या पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या कारकिर्दीतील कामाविषयी आभार व्यक्त करतानाच ' You Cared People and Planet' असं कॅप्शन दिलं आहे. अन् नेमकं तेच अग्निहोत्रींना खटकलं आणि त्यांनी दियाचा क्लास घेतला.(Vivek Agnihotri mocks Dia Mirza as she thanks Uddhav Thackeray)
दिया मिर्झानं तिच्या ट्वीटर अकाऊंटवर उद्धव ठाकरेंचे धन्यवाद मानणारी एक पोस्ट शेअर केली होती. ज्या पोस्टला कॅप्शन देत तिनं म्हटलं आहे,''उद्धवजी तुमचे खूप आभार,आपल्या कारकिर्दीत तुम्ही Planet आणि त्यावरील माणसांची काळजी घेतलीत म्हणून. तुमच्या कामामुळे मला तुमचा खूप आदर वाटतो. तुम्हाला देशाची जबाबदारी सांभाळण्याच्या खूप चांगल्या संधी यापुढे मिळत राहो''. दिया मिर्झानं हे ट्वीट उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना देखील टॅग केले आहे. दियाच्या या ट्वीटला प्रतिउत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे,'कोणतं Planet? Planet Bollywood का?'
विवेक अग्निहोत्री यांनी दिया मिर्झाची थट्टा उडवताच तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्या बचावात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तिच्या अनेक फॉलोअर्सनी तिचं ट्वीट व्हायरल करत नवीन सरकारविरोधात बोलायला सुरुवात केली आहे. आरे कॉलनीतील झाडांना तोडून कसं नवं सरकार मेट्रो कार शेड बांधण्याच्या प्रोजेक्टला पुढे नेतंय यावर देखील आवाज उठवला गेला आहे.
दियानं उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यासाठी आभार व्यक्त करणारी चांगली पोस्ट केली असली तरी बॉलीवूडमधनं कंगनानं मात्र त्यांच्याविरोधात सूर काढलेला आपण सगळ्यांनीच पाहिला.
दिया मिर्झाविषयी बोलायचं झालं तर सध्या ती 'धक धक' सिनेमात काम करतेय. या सिनेमात तिच्यासोबत रत्ना पाठक-शहा, फातिमा सना शेख, संजना संघी देखील मुख्य भूमिकेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.