Vivek Agnihotri New Series Esakal
मनोरंजन

Vivek Agnihotri:काश्मिर विषयी आता नवे पत्ते ओपन करणार अग्निहोत्री..नव्या सीरिजसाठी 5 वर्षांचा रिसर्च अन् 600 मुलाखती..

'द काश्मिर फाईल्स' नंतर विवेक अग्निहोत्री आता 'The Kashmir Unreported' ही वेब सीरिज ओटीटीवर घेऊन येत आहेत.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri: 2022 चा ब्लॉकबस्टर सिनेमा 'द काश्मिर फाईल्स' बनवल्यानंतर आता विवेक अग्निहोत्री पुन्हा आपल्या भेटीस काश्मिर या विषयावरील डॉक्यमेन्ट्री सीरिज घेऊन येत आहेत. यासाठी त्यांनी ५ वर्ष रिसर्चसाठीच घालवली आहेत.

विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी सिरीजचं नाव आहे 'The Kashmir Unreported'. ही सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहे. विवेक अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे की खूप सारं रिसर्च मटेरिअल त्यांच्याकडे 'द काश्मिर फाईल्स' करताना जमा झालं होतं जे ते सिनेमात दाखवू शकले नाहीत. या सगळ्या गोष्टी देखील ते आपल्या या आगामी सीरिजमध्ये सामिल करणार आहेत.(Vivek Agnihotri New series 'The Kashmir Unreported')

विवेक अग्निहोत्री 'द काश्मिर फाईल्स' नंतर जोरदार चर्चेत आले आणि त्यांच्या आगामी सिनेमाची लोक आतुरतेने वाट पाहत होते. विवेक अग्निहोत्री यांचा आगामी 'द वॅक्सिन वॉर' १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

आता कानावर पडतंय की या सिनेमाची रिलीज डेट बदलली जाऊ शकते. विवेक अग्निहोत्री यांच्या सिनेमाची चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत होते त्यांना आधी काश्मिरवरची ही नवी सीरिज पहायची संधी मिळणार आहे.

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

विवेक अग्निहोत्री यांनी दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत आपल्या या आगामी डॉक्युमेन्ट्री सीरिज विषयी सांगितले आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले की,''द काश्मिर अनरिपोर्टेड' वेबसीरिजसाठी मी ५ वर्षांचा रीसर्च केला आहे. या सीरिजमध्ये मी काश्मिरी पंडीतांच्या पलायनवादाशी जोडलेले मुद्दे,त्यांचा झालेला छळ,त्यांच्या समस्या आणि सिनेमासाठी केलेल्या रिसर्चला देखील समाविष्ट केलं आहे. या सीरिजला सिनेमाचाच दुसरा भाग देखील म्हटलं जाऊ शकतं''

माहितीनुसार,विवेक अग्निहोत्री यांनी या वेब सीरिजसाठी ६०० ते ७०० लोकांच्या मुलाखती केल्या होत्या. सीरिजचं शूटिंग अर्धअधिक पूर्ण झालं आहे आणि त्याचं शेवटचं शेड्युल बाकी आहे.

विवेक यांनी सांगितलं की या सीरिजला केवळ भारतात नाही तर इतर देशातही शूट केलं जाणार आहे. या सीरिजच्या रीलिज डेटचा विचार केला तर विवेक या उन्हाळी सुट्टयांमध्ये ही सीरिज रिलीज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT