'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) या सिनेमावरनं प्रदर्शना आधीपासूनच अनेक वाद रंगले. इतकंच काय तर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तर राजकीय,सामाजिक तसंच अगदी बॉलीवूड मधूनही वादाचा सूर उमटलेला आपण सर्वांनीच पाहिला. तरिही सिनेमाचं कथानक सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनाला इतकं भिडलं की बॉक्सऑफिसवर या सिनेमाची घोडदौड कुणीच थांबवू शकलं नाही. या सिनेमात १९९० साली काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आणि पलायनवादावर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थातच कुणी या सिनेमाला राजकीय खेळी म्हटलं तर कुणी मुस्लिमांविरोधातला सिनेमा म्हणत धार्मिक वाद रंगवण्याचा प्रयत्न केला.
आता सिनेमा प्रदर्शित होऊन इतके दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद्याच्या नव्या मुद्द्यानं डोकं वर काढलं आहे. दिसून आलंय की विकीपीडियाच्या पेजवर सिनेमासाठी असं काही लिहिलं गेलं आहे की ज्यानं सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) नाराज झाले आहेत. त्यांनी ट्वीट करत विकीपीडियाला फटकारालं आहे. इतकंच नाही तर विवेक अग्निहोत्रीनं जे काही लिहीलं गेलंय ते त्वरित एडिट करा असा इशारा देखील केला आहे.
विकीपीडियाच्या पेजवर द काश्मिर फाईल्स सिनेमासंदर्भात लिहिलं आहे की,'' २०२२ मध्ये बनलेला द काश्मिर फाईल्स सिनेमा हा एक हिंदी भाषीक ड्रामा आहे,ज्या सिनेमाला विवेक अग्निहोत्री यांनी लिहीलं आणि दिग्दर्शित केलं आहे, सिनेमात दाखवलेला काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार,त्यांचा पलायनवाद यावर आधारित कथानक हे काल्पनिक आहे. साल १९९० मध्ये जो काश्मिरात सामूहिक नरसंहार झाला,ज्याबाबतील सर्वसाधारणपणे आतापर्यंत बोललं गेलं आहे की हे खोटं आहे आणि षडयंत्रानं तयार केलेल्या काल्पनिक कथांवर आधारित आहे''.
विवेक अग्निहोत्री यांनी विकीपीडियाच्या ट्वीटर पेजला टॅग करत लिहिलं आहे- ''प्रिय,विकीपीडिया,तुम्ही यामध्ये इस्लामोफोबिया,प्रोपेगैंडा,संघी,कट्टर असे शब्द जोडणं विसरलात. तुम्ही तुमची धर्मनिरपेक्षता अशी असलेली ओळख कदाचित विसरत चाललेले आहात. लवकरच या माहितीला एडिट करा''.
विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला द काश्मिर फाईल्स सिनेमा प्रेक्षकांना खूप पसंत आला होता. सिनेमानं बॉक्सऑफीसवर तगडी कमाई केली. या सिनेमानंतर द दिल्ली फाईल्स हा सिनेमा विवेक अग्निहोत्री करत आहेत. तशी अधिकृत घोषणाही त्यांनी केली आहे. मात्र अद्याप सिनेमात नेमकं कशावर भाष्य केलं जाणार याविषयी काहीच माहिती समोर आलेल नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.