vivek agnihotri 'The Vaccine War' announces 'buy 1 get 1' ticket after 'Jawan' SAKAL
मनोरंजन

The Vaccine War: कमाईसाठी मोठी शक्कल! जवान नंतर द व्हॅक्सीन वॉरची एकावर एक तिकीट फ्री ऑफर

द व्हॅक्सीन वॉर सिनेमा पाहा. ते सुद्धा एकावर एक तिकीट फ्री. वाचा सविस्तर

Devendra Jadhav

The Vaccine War: व्हॅक्सीन वॉर सिनेमा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालाय. नाना पाटेकर यांची प्रमुख भुमिका असलेला या सिनेमाची रिलीजआधीपासुनच चर्चा होती.

सिनेमा रिलीज झाला पण सिनेमाने बॉक्स ऑफीसवर हवं तसं यश मिळलं नाही. त्यामुळे आता सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक वेगळी ऑफर लोकांसमोर आणली आहे. आता व्हॅक्सीन वॉर सिनेमाचं तिकीट 1 + 1 फ्री मिळणार आहे. या ऑफरबद्दल सविस्तर जाणून घ्या.

(vivek agnihotri 'The Vaccine War': Vivek Agnihotri announces 'buy 1 get 1' offer)

'द काश्मीर फाईल्स' या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटानंतर दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीचे 'द व्हॅक्सिन वॉर' हे पुनरागमन करत आहे. नाना पाटेकर स्टारर या चित्रपटाने बॉक्सवर ३.२५ कोटींची कमाई केली आहे. तथापि, चित्रपट निर्मात्याने इंस्टाग्रामवर चित्रपटासाठी '1 खरेदी करा 1 तिकीट विनामूल्य' ऑफरची घोषणा केली.

इंस्टाग्रामवर घेऊन विवेकने लिहिले की, "मित्रांनो, आज रविवार आणि गांधी जयंतीच्या सुट्टीच्या निमित्ताने #TheVaccineWar ला भेट द्या आणि मोफत तिकीट मिळवा. हे मोफत तिकीट तुमच्या मोलकरीण, घरकाम करणाऱ्या किंवा स्त्री/मुलीला द्या. कृपया आनंद घ्या."

द कश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक यांच्या व्हॅक्सीन वॉरची तुफान चर्चा होती. दरम्यानच्या काळात नानांनी प्रमोशनच्या निमित्तानं ज्या मुलाखती दिल्या होत्या त्यामुळे देखील त्याकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिले जात होते. अशातच या चित्रपटाला मिळालेली ओपनिंग फुकरे ३ च्या तुलनेत कमी असल्याचे दिसते. त्यामुळे या ऑफरमुळे द व्हॅक्सीन वॉरला फायदा होणार का हे पाहायचं आहे.

काही दिवसांपुर्वी शाहरुखच्या जवान सिनेमाने सुद्धा अशीच ऑफर दिली होती. जवान सिनेमाची तिकीटं 1 + 1 फ्री मिळणार आहे. या ऑफरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे सिनेमाच्या कमाईमध्ये चांगली वाढ झालेली दिसते.

आता हीच आयडिया विवेक अग्निहोत्रींनी वापरली आहे. यामुळे द व्हॅक्सीन वॉर च्या कमाईत किती वाढ होणार हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT