Nana Patekar & Vivek Agnihotri Google
मनोरंजन

Nana Patekar: अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सिन वॉर' मध्ये नाना पाटेकर 'या' भूमिकेत वेधून घेणार लक्ष

'द व्हॅक्सिन वॉर' हा सिनेमा कोरोना योद्धांवर आधारित असल्यानं अख्ख्या जगाचं लक्ष अग्निहोत्रींच्या या सिनेमाकडे लागून राहिलं आहे.

प्रणाली मोरे

Nana Patekar: विवेक अग्निहोत्री यांचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट 'द व्हॅक्सिन वॉर'चे शूटिंग अखेर पूर्ण झाले आहे. अशातच, निर्मात्यांनी या सिनेमातील पात्रांबद्दल खुलासा केला आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री यांनी अलीकडेच खुलासा केला की 'कांतारा'या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सप्तमी गौडाला 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये सामील करण्यात आले आहे. तसेच, या चित्रपटाशी संबंधित एका नव्या घोषणेनुसार, नाना पाटेकर 'द व्हॅक्सिन वॉर'मध्ये मुख्य व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.

याबद्दल बोलताना विवेक रंजन अग्निहोत्री म्हणाले, "आय एम बुद्धा मध्ये, आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम प्रतिभांसोबत काम करण्यासाठी कमिटेड आहोत. 'द व्हॅक्सिन वॉर'साठी, हीरोला पावरफुल, क्रेडिबल आणि अंडरप्ले्ड व्हायचे होते''.

''आणि जेव्हा आम्ही ज्याचा परफॉर्मन्स निर्विवाद आहे अशा व्यक्तीला कास्ट करण्याचा विचार करत होतो तेव्हा आम्हाला नाना पाटेकर यांचे नाव सुचले. हा अभिनेता अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जे कोणत्याही भूमिकेत चमकतात. तसेच, त्यांनी कधीही आपली कला, आपल्या अभिनयाशी तडजोड केली नाही."(Vivke Agnihotri The Vaccine War nana patekar lead actor)

चित्रपटाच्या निर्माती आणि सहकलाकार पल्लवी जोशी म्हणाल्या, "नाना कदाचित त्या रिअल ब्रीडचे अभिनेता आहेत ज्यांना सिनेमाचे वेड आहे. त्यांचे पूर्ण लक्ष प्रोजेक्टच्या अधिकाधिक प्रगतीवर असते. ते पटकथेत इतके गुंतून जातात की कधी कधी नाना आणि त्यांनी साकारलेल्या पात्रात फरक करणं कठीण होतं''.

'' ते प्रत्यक्षात दिलेल्या ब्रीफ आणि पॅरामीटर्समध्ये पर्यायांचा बुफे प्रदान करतात. क्विक फिक्स फेमच्या या दिवसांमध्ये अशा प्रकारची कमिटमेंट दुर्मिळ आहे. अभिनेता म्हणून मला अभिमान वाटतो की नाना पाटेकर आणि मी एकाच प्रोफेशनचे आहोत. प्रत्येक शॉटमध्ये त्यांचे पात्र पडद्यावर उलगडताना पाहणे ही एक जादू होती."

अशातच, जिथे लोक कोरोनावरील विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते तिथे काही एजन्सी, पक्ष सतत या विजयाची बदनामी करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते.

तेव्हापासून, विवेक अग्निहोत्री नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असून त्यांचा पर्दाफाश करत आहेत. तसेच, भारतात बनवण्यात आलेली लस इतकी प्रभावी ठरली आहे की, देशाची लोकसंख्या १.४ अब्ज असूनही, नागरिकांवर कोरोनाचा परिणाम झालेला नाही.

त्याचवेळी चीन, ब्रिटन आणि इतर अनेक देश 2023 मध्ये कोरोनाशी झुंज देत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांचा 'द व्हॅक्सिन वॉर'हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी 11 भाषांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT