Jaya Bachchan Birthday Esakal
मनोरंजन

Jaya Bachchan: 43 वर्षांपूर्वी असा काय वाद झाला की विवेकानंदांच्या गेटअपमधील जया बच्चनचा सिनेमा अचानक बंद पडला.. वाचा

जया बच्चननी धर्मेंद्र सोबत 'डॉक्टर बाबू' सिनेमात काम केलं होतं,ज्यात विवेकानंदांच्या गेटअपमधील त्यांच्या लूकनं सगळ्यांनाच थक्क करुन सोडलं होतं.

प्रणाली मोरे

Jaya Bachchan: आज ९ एप्रिल जया बच्चन यांचा वाढदिवस आहे. तशा जया बच्चन त्यांच्या चिडचिड्या स्वभावामुळे अनेकदा वादात सापडतात,सारे त्यांचा राग राग करतात. पण आज आपण त्यांच्या ४३ वर्षापूर्वीच्या एका भूमिकेविषयी जाणून घेणार आहोत,ज्यातील एका लूकनं सर्वांना थक्क केलं होतं.

जया बच्चन यांनी एका सिनेमात स्वामी विवेकानंदांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली होती. सिनेमा अर्ध्यापेक्षा अधिक शूट झाला होता,पण नंतर रंगलेल्या एका वादानं सगळंच उद्ध्वस्त केलं होतं. अजूनही तो सिनेमा पूर्ण करण्याची हिम्मत कोणीच केली नाही.

स्वामी विवेकांनंदांची भूमिका साकारण्याचं धाडस करणाऱ्या जया बच्चन यांचा आज ७५ वाढदिवस आहे. या फोटोला काही वर्ष आधी अमिताभ बच्चनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं.

फोटो शेअर करत अमिताभनी लिहिलं होतं की,'डॉक्टर बाबू मध्ये जया...'. त्या सिनेमात जया बच्चन यांनी विवेकानंद साकारले होते. काही कारणानं सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही.(When Jaya Bachchan turned swami vivekanand in shelved movie 'Daktar) Babu',unseen pic

जया बच्चन यांचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले होते. एका नजरेत कोणीच ओळखू शकत नाही की त्या जया बच्चन आहेत. जया यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १५ व्या वर्षापासून केली होती.

त्यांचा पहिला सिनेमा १९६३ साली आला होता,ज्याचं नाव होतं 'महानगर'. हा एक बंगाली सिनेमा होता. बंगाली सिनेमातून पदार्पण केल्यानंतर त्यांनी काही आणखी सिनेमे केले ज्यामधली एक होती 'डॉक्टर बाबू'.

जो सिनेमा ८० टक्के काम पूर्ण होऊनही अर्धवट राहिला होता. या सिनेमाला नब्येंदु घोषनं दिग्दर्शित केलं होतं. सिनेमावरनं मोठा वाद रंगला होता. हा सिनेमा पूर्ण का होऊ शकला नाही,जया बच्चन विवेकानंदांच्या गेटअपमध्ये का दिसत आहेत,हे सगळं नब्येंदु घोष यांचा मुलगा शुभांकरनं २०२० मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं.

शुभांकर घोषनं सांगितलं होतं की सिनेमात धर्मेंद्र यांची भूमिका एका डॉक्टरची होती,जे स्वामी विवेकानंद यांना देवासमान मानत असतात. जया बच्चन त्या सिनेमात जमीनदाराच्या मुलीची भूमिका साकारत होत्या..ज्यांचे डॉक्टरवर प्रेम जडते. त्यामुळे डॉक्टरला इम्प्रेस करण्यासाठी त्या आजारी पडल्याचं खोटं नाटक करतात आणि स्वामी विवेकानंदांचा गेटअप करुन डॉक्टरला भेटायला जातात.

हे फक्त डॉक्टरनं त्यांच्यावर रागावू नये म्हणून त्या करतात. जेव्हा डॉक्टर(धर्मेंद्र) स्वामी विवेकानंदांच्या गेटअपमध्ये जया यांना पाहतात तेव्हा हैराण होऊन जातात पण नंतर जया डोक्यावरील पगडी काढत आपलं सत्य समोर आणतात.

'डॉक्टर बाबू' सिनेमा फनिश्वर नाथ रेनू यांच्या 'मैला आंचल' या हिंदी पुस्तकावर आधारित होता. सिनेमात जया बच्चन,धर्मेंद्र यांच्या व्यतिरिक्त उत्पल दत्त आणि उर्मिला भट्ट होत्या. सिनेमाची कथा एका तरुण डॉक्टरवर आधारित होती. जो गरिबांवर उपचार करण्यासाठी बिहारच्या एका छोट्या गावात येतो.

पण या डॉक्टरला एक गोष्ट तिथे खूप हैराण करुन सोडते कारण तो गावात ज्याचा पण इलाज करायला जातो तिथे त्याला त्याची जात विचारली जाते. भले माणूस किती आजारी असू दे,पण तरीदेखील त्यापेक्षा अधिक गावातल्या लोकांसाठी स्पृश्य-अस्पृश्य,जात-पात हे विषय महत्त्वाचे असतात.

सिनेमा८० टक्के पूर्ण झाला होता.पण निर्माता आणि डिस्ट्रीब्युटरमध्ये मोठं भांडण झालं,ज्यानंतर सिनेमा अडचणीत सापडला. काही दिवसांनी सिनेमाच्या निर्मात्याचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा परत बिहारमध्ये गेला. सिनेमाचे निगेटिव्ह कोपऱ्यात धूळ खात पडले. शुभांकर घोषनं सांगितलं की जेव्हा मुंबईत पूर आला तेव्हा लॅबमध्ये पाणी भरलं आणि त्या सिनेमाचे सर्व निगेटिव्ह त्यात वाया गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT