Shah rukh Khan, Kajol Google
मनोरंजन

जेव्हा काजोलला येते शाहरुखची आठवण,तेव्हा समोर येते पडद्यामागची धमाल

अभिनेत्रीनं शाहरुखसोबतच्या ऑफस्क्रीन आठवणींचा शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमधील(Bollywood) काही जोड्यांना कायम एकत्र पडद्यावर पाहणं हा एक सुखानुभव असतो त्या जोड्यांपैकी एक म्हणजे शाहरुख(Shah Rukh Khan) आणि काजोलची(kajol) जोडी. या दोघांनी एकत्र जितके सिनेमे केले आहेत त्या सगळ्याच सिनेमांनी जवळजवळ पडद्यावर कमाल करुन दाखवली आहे. चाहत्यांनी नेहमीच त्या दोघांना एकत्र पाहणं पसंत केलं आहे. अर्थात या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्यामुळे नेहमीच ऑनस्क्रीन ते दोघे एकमेकांसोबत खूप सहज वावरताना दिसले. त्यांच्यात ऑफस्क्रीन केमिस्ट्री भन्नाट असल्याकारणानं ऑनस्क्रीनही त्यांच्यात सगळं उत्तम जमून य़ायचं. अगदी बाजीगर पासून एकत्र सुरु झालेला त्यांचा प्रवास अलिकडच्या दिलवाले सिनेमापर्यंत नेहमीच रंगतदारच झालेला दिसून आलाय. वर्षागणिक त्यांच्यातील केमिस्ट्री आपण नेहमी रंगतानाच पाहिली आहे.

काजोल सोशल मीडियावर अधनं-मधनं सक्रिय होते. आताही तिनं 'माय नेम इज खान' या शाहरुखसोबत केलेल्या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओत तिनं शुटिंगच्या सेटवरची धमाल-मस्तीच्या आठवणी एकत्र केल्या आहेत. या सिनेमाला बारा वर्ष झाल्याच्या आठवणीत तिनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिनं हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे, ''या सिनेमातील मंदिरा माझ्या नेहमीच जवळची होती. आणि या सिनेमाशी त्यामुळेच माझं खूप जवळचं नातं आहे''. आज इतक्या वर्षांनंतरही हा सिनेमा छोट्या पडद्यावरही मोठ्या आवडीनं प्रेक्षकवर्ग पाहतो. काजोलच्या व्हिडीओ पोस्टवर तिची बहिण तनिषा मुखर्जीनं हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर चाहत्यांनी शाहरुखसोबत पुन्हा लवकर काम कर अशी विनंतीही केलेली प्रतिक्रियांमध्ये वाचायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT