Filmfare Awards, Filmfare Awards 2023, kangana ranaut, kangana ranaut news, kangana ranaut filmfare awards  SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards 2023: म्हणुन फिल्मफेयर अवॉर्ड्स विरुद्ध कंगना कोर्टात जाणार होती.. बघा संपूर्ण प्रकरण

कंगना रणौतने हा वाद ओढवून घेतला होता.

Devendra Jadhav

Kangana ranaut Go To Court Against Filmfare Awards News: दरवर्षीप्रमाणे या वर्षीही फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 शानदार पद्धतीने रंगणार आहे.

फिल्मफेयर पुरस्कार मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 27 एप्रिल 2023 रोजी रंगणार आहे.

या सोहळ्यात कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. फिल्मफेयर पुरस्काराने आजवर अनेक वाद ओढवून घेतले.

यातलाच एक वाद गेल्या वर्षीच्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात झाला. कंगना रणौतने हा वाद ओढवून घेतला होता.

(When Kangana ranaut Go To Court Against Filmfare Awards.. filmfare awards 2023)

हेही वाचा: Types of Vedas: वेदांचे प्रकार

झालं असं की.. २०२२ फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात कंगना रणौतला थलायवी चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी 67 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीमध्ये नॉमिनेशन मिळाले.

परंतु कंगनाने फिल्मफेयर अवॉर्ड शोवर 'अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अनुचित प्रथा' अशा शब्दात टीका केली.

याशिवाय तिने सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला जबाबदार असा आरोप सुद्धा फिल्मफेयर लगावला होता.

कंगनाने निर्माण केलेल्या गदारोळानंतर, फिल्मफेयरने तिचे बेस्ट अभिनेत्रीसाठी नामांकन मागे घेतले. कंगनाचे आरोप खोटे आहेत असं विधान फिल्मफेयरतर्फे करण्यात आलं होतं.

फिल्मफेयरने निवेदनात असं लिहिलं आहे की, "फिल्मफेअरबद्दल कंगना रणौतने केलेल्या अवास्तव, बेजबाबदार टिप्पणीमुळे आम्हाला त्रास होत आहे."

फिल्मफेयरने सविस्तर निवेदनात म्हटलं आहे की, "पुरस्काराच्या वेळी फिल्मफेअरच्या कार्यकारी संपादकाने कंगना रणौत यांना त्यांच्या प्रमुख भूमिकेत, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन दिल्याची माहिती दिली.

अगदी आमंत्रण पाठवण्यासाठी तिचा पत्ताही विचारला." पुढे फिल्मफेयरने कंगनाला एक जुनी आठवण करुन दिली. "

2014 आणि 2015 मध्ये फिल्मफेयर सोहळ्यात उपस्थित नसताना किंवा कार्यक्रमात परफॉर्मन्स न करताही कंगनाला दोनदा फिल्मफेअर पुरस्कार कसा देण्यात आला.

कंगनाला 'क्वीन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशी पोस्ट फिल्मफेयरने केली.

आणि पुढे कंगनाच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे फिल्मफेयरने गेल्या वर्षी २०२२ ला कंगनाचं बेस्ट अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मागे घेतलं.

फिल्मफेअरने बेस्ट अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मागे घेतल्यावर शांत बसेल ती कंगना कसली? कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली,

"फिल्मफेयरने शेवटी माझं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मागे घेतलं आहे. भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धच्या या लढ्यात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानते. पण मी हा अन्याय सहन करणार नाही.

त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहे... असे अनैतिक पुरस्कार सोहळा बंद करण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे." असं लिहून फिल्मफेयरला कोर्टात खेचण्याची तयारी कंगनाने दाखवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT