When late singer KK refused to sing at wedding functions  Google
मनोरंजन

1 करोडची ऑफर देऊनही 'KK' ने गायला दिला होता नकार; काय होतं कारण...

'व्हॉइस ऑफ लव्ह' म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केके चं वयाच्या ५३ व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

प्रणाली मोरे

म्युझिक इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा काळानं प्रहार केलाय. कितीतरी सुपरहिट गाण्यांना आवाज देणारा,तरुणाईच्या गळ्यातील ताईत मानला जाणारा गायक कृष्ण कुमार कुन्नथ उर्फ केके(KK) चं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. एवढ्या दिग्गज गायकाचा मृत्यू झाल्यानं संगीत क्षेत्र मात्र पुन्हा हादरलं आहे. कारण गेल्या काही महिन्यात अनेक संगीतातील हिरे हे जग सोडून निघून गेले आहेत. आता केके च्या निधनानंतरही बोललं जातंय की हे एवढं मोठं नुकसान झालं आहे जे कधीच भरून काढता येणार नाही.

केके चं संगीतावर खूप प्रेम होतं. तो आपल्या प्रत्येक गाण्याला इतकं मनापासून गायचा की त्याचा आवाज गाणं ऐकणाऱ्याच्या मनाचाच थेट ठाव घ्यायचा. केके बॉलीवूडमधील दिग्गज गायकांपैकी एक म्हणून ओळखला जायचा. त्याला सिनेमांसोबतच वेगवेगळ्या कॉन्सर्टसाठी आणि इव्हेंट्ससाठी गाण्याची ऑफर्स दिली जायची. पण तुम्हाला हे माहित आहे का की त्यानं इतर गायकांसारखं कधीच कुठल्या बड्या लग्नाच्या पार्टीत गाणं पसंत केलं नाही.

केकेला एकदा त्याच्या मुलाखतीत विचारल होतं की,'कधी तू गायक म्हणून कोणाची ऑफर स्विकारायला नकार दिला आहेस का?' त्यावर केके म्हणाला होता- ''हो,मी लग्न सोहळ्यात गाणं गायला नेहमीच नकार देतो,मग मला १ करोड रुपये कोणी ऑफर केले तरी माझा निर्णय बदलत नाही''. कितीतरी गायक असे आहेत,जे गाण्यासोबत अभिनयाची हौसही भागवतात. केके ला सुद्धा जेव्हा अभिनयाची ऑफर देण्यात आली होती. तेव्हा तो म्हणाला होता, ''कृपया,अभिनय माझ्यापासून लांबच ठेवा''. उपरोधिकपणे म्हणाला होता,''मी पी-नट्ससाठी अॅक्टिंग करणार नाही. काही वर्ष आधी मला सिनेमा ऑफर झाला होता पण मी नकार दिला होता'' असं देखील केके त्यावेळी म्हणाला होता.

कृष्ण कुमार कुन्नथ उर्फ केके च्या विचारांवरुन हे स्पष्ट होतं की त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम हे संगीतच होतं. संगीताप्रतीचं त्याचं प्रेम त्चाच्या गाण्यातून आणि आवाजातून स्पष्ट कळतं. केके नं 'माचिस' सिनेमातील 'छोड आए हम' गाण्याचा भाग बनून बॉलीवूडच्या संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' या गाण्यामुळं त्याला खूप प्रसिद्धि मिळाली. आणि मग त्यानंतर त्यानं कधी मागे वळून पाहिलं नाही. त्याचं हे गाणं ऐकलं की आजही लोकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. अशा केके च्या अचानक जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT