rishi kapoor, filmfare, rishi kapoor filmfare, rishi kapoor 30000, rishi kapoor movies, rishi kapoor songs  SAKAL
मनोरंजन

Rishi Kapoor: जेव्हा ऋषी कपूर यांनी 'या' सिनेमातील भूमिकेसाठी ३० हजार देऊन फिल्मफेयर विकत घेतला होता

ऋषी कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विषयांवर स्वतःची मतं उघड केली

Devendra Jadhav

Rishi Kapoor Death Anniversary: आज ऋषी कपूर यांचा स्मृतीदिन. ऋषी कपूर एकदम 'खुल्लमखुल्ला' माणूस.

ऋषी कपूर यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. ऋषी कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विषयांवर स्वतःची मतं उघड केली.

आजवर मी अनेक चुका केल्या असंही ऋषी कपूर यांनी अनेकदा प्रांजळपणे कबुल केलंय. अशाच एका चुकीचा उल्लेख ऋषी कपूर यांनी केला.

जेव्हा त्यांनी चक्क पैसे देऊन फिल्मफेयर पुरस्कार विकत घेतला होता.

(When Rishi Kapoor bought Filmfare by paying 30 thousand for afraid of amitabh bachchan)

ऋषी कपूर यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं की, त्यांचे तरुण जीवन फारसे प्रेरणादायी नव्हते.

अशाच एका मुलाखतीत त्यांनी पुरस्कार खरेदीचा उल्लेख केला होता. तो पुरस्कार म्हणजे फिल्मफेयर..

हा पुरस्कार त्याकाळचा आघाडीचा नट आपल्याकडून हिसकावून घेईल अशी ऋषी कपूर यांना भीती होती. तो समकालीन नट दुसरा कोणी नसून तो अमिताभ बच्चन होता. काय होता तो किस्सा बघूया..

1973 साल होते. आणि फिल्मफेयरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये अमिताभ आणि ऋषी या दोन्ही स्टार्सना त्यांच्या चित्रपटांसाठी नामांकन मिळाले होते.

ऋषी यांनी बॉबीच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तर अमिताभ यांनी जंजीरमधील अँग्री यंग मॅन म्हणून यश मिळवले होते.

ऋषी कपूर यांना भीती होती की अमिताभ सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जिंकेल.

ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लमखुल्ला आत्मचरित्रात या गोष्टीचा उल्लेख केलाय. ऋषी कपूर यांनी सांगितले, “मी २०-२१ वर्षांचा होतो. ‘बॉबी’ नंतर मी अचानक मोठा स्टार झालो.. मी त्या दिवसांत हवेत उडत होतो...

या काळात कोणीतरी माझ्याकडे आले आणि म्हणाले की ‘मला हा पुरस्कार मिळू शकतो… तुला आवडेल का?’

मी त्या व्यक्तीकडून एकदा खात्री करून घेतली. त्या व्यक्तीने सांगितले की त्यासाठी 30,000 रुपये लागतील... तेव्हा तो मोठा पैसा होता. मी एका माणसाला पैसे दिले.

परंतु पुढे ते त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाय माहित नाय” असा खुलासा ऋषी कपूर यांनी केला. आज चिंटू म्हणजेच ऋषी कपूर आपल्यात नसले तरीही त्यांचे सिनेमे आपलं मनोरंजन करतील यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT