When Sachin Pilgaonkar fell in love with Supriya...lovestory  Google
मनोरंजन

सचिनचं पहिलं लग्न झालंय म्हणून सुप्रियाने नकार दिला होता? जाणून घ्या लव्हस्टोरी

सचिन-सुप्रिया पिळगावकर ही जोडी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांची केवळ ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीनही आवडती जोडी आहे.

प्रणाली मोरे

Sachin-Supriya Lovestory: सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावर ही मराठी सिनेसृष्टीतील ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही सुपरहिट जोडी. गेली अनेक वर्ष दोघांनीही आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन केले आहे. पण जेव्हा दोघांनी 'नच बलिये' या रिअॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता तेव्हा दोघांची एनर्जी, नृत्यकौशल्य पाहून ते सगळ्यांचेच फेव्हरेट झाले अन् पुन्हा चाहते त्यांच्या प्रेमात पडले. ही गोष्ट तेव्हाची जेव्हा सोशल मीडिया नव्हतं,चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला निवडायचे ते वोटिंग करून. आणि त्या बळावर सुप्रिया-सचिन जोडीनं नच बलियेच्या पहिल्या सिझनच्या विजेते पदावर आपलं नाव कोरलं होतं. आजही तो सिझन लोकांचा फेव्हरेट सिझन म्हणून ओळखला जातो.(When Sachin Pilgaonkar fell in love with Supriya...lovestory)

सचिन पिळगावर यांनी अभिनयसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. आज जवळपास ५० वर्ष ते इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी केवळ मराठी नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली आहे. 'शोले', 'बालिका वधू','पिया का घर' अशा अनेक गाजलेल्या हिंदी सिनेमात ते दिसले आहेत. त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं आहे. अवतार,सत्ते पे सत्ता, गीत गाता चल अशा सिनेमांतूनही ते दिसले होते. अभिनयाबरोबरच सचिन पिळगावकरांनी एक दिग्दर्शक म्हणूनही आपली कारकिर्द गाजवली. 'नवरी मिळे नवऱ्याला' या त्यांच्या सिनेमाची तर अनेकांनी पारायणं केली. या सिनेमाचं त्यांच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. कारण याच सिनेमाच्या सेटवर त्यांना भेटल्या त्यांच्या सहचारिणी सुप्रिया पिळगावकर. सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीत आपल्या या लव्हस्टोरी विषयी अनेक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, ''मी पहिल्यांदा सुप्रियाला स्टेजवर परफॉर्म करताना पाहिलं आणि मला ती भलतीच क्यूट वाटली''.

ते म्हणाले,''आम्ही एकत्र खूप काम केलं पण माझ्या मनातील भावना सुप्रियाला सांगायची हिंमत कधीच मला झाली नाही. पण जेव्हा मी धाडस करुन पहिल्यांदा सुप्रिया समोर मनातील भावना व्यक्त केल्या तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. आता का? तर ते कारणही मोठं आहे. ती तेव्हा होती १७ वर्षाची आणि मी २७ वर्षांचा. आमच्यात दहा वर्षाचं अंतर. त्यामुळे तिला वाटलं होतं माझं लग्न झालं असेल. आणि त्यामुळेच तिला वाटलं एक लग्न झालेला माणूस प्रपोज करतो म्हणजे काय. पण असो पुढे खरं काय ते कळलं अन् आमची लव्हस्टोरी पुढे सरकली''. सुप्रिया-सचिन यांनी १९८५ मध्ये लग्नगाठ बांधली.

'नवरी मिळे नवऱ्याला' हा सुप्रिया पिळगावकरांचा अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा. त्यावेळी सचिन पिळगावकरांच्या दिग्दर्शनानं आपल्याला चांगला अभिनय करुन उत्तम अभिनेत्री होण्याला सहकार्य केलं असं सु्प्रिया पिळगावकर अनेकदा म्हणाल्या आहेत. सचिनजींनीच आपल्याला अभिनय क्षेत्रात पुढे जायला, वेगळ्या वाटा चोखंदळायला मदत केली असं सुप्रिया पिळगावकर यांनी सांगितलं आहे. ''जर मी सचिनच्या दिग्दर्शनाखाली घडले नसते तर कदाचित मी आज जो अभिनय करते तो करू शकले नसते. मी दिग्दर्शक जसं सांगतो तसं करणारी अभिनेत्री आहे. त्यामुळे त्यांनीच मला आत्मविश्वास दिला,मार्गदर्शन केलं''.

'तू-तू-मै-मै' या सचिन-सुप्रिया यांच्या मालिकेनं तर प्रेक्षकांना एका काळी वेड लावलं होतं. सचिन पिळगावकरांचे दिग्दर्शन आणि सुप्रिया-रिमा यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणजे कमाल म्हणावी लागेल. त्या मालिकेतील कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना केवळ भावला नाही तर त्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

आज सचिन-सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकरही अभिनयक्षेत्रात आपलं नाव कमावत आहे. तिनं 'मिर्झापूर','गिल्टी माइंड्स','द ब्रोकन न्यूज अमंग अदर्स' अशा अनेक कलाकृतीत काम करुन आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. ओटीटीवर श्रियाचा असा वेगळा चाहता वर्ग आता तयार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT