प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधीपासूनच ती चर्चेत होती. एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने तिच्या शाळेतील एका घटनेविषयी सांगितलं. सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे मंत्री असल्यामुळे त्यांना सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागत असत. शत्रुघ्न यांच्या सोबत सोनाक्षीला देखील सुरक्षा देण्यात आली होती. याविषयी सोनाक्षीने झालेल्या त्रासाबद्दल करिना कपूरच्या शोमध्ये सांगितले होते. (When Sonakshi Sinha threatened to quit school after her father Shatrughan Sinha became minister)
करिना कपूरच्या शोमध्ये शाळेतील अनुक्षव सांगताना सोनाक्षी म्हणाली की, "तेव्हा मला खूप विचित्र वाटत होते. कारण मी कुठेही बाहेर गेले की प्रत्येक वेळी माझ्यासोबत कोणीतरी येत होते. जेव्हा माझे वडील मंत्री झाले, तेव्हा मी सहावी-सातवीत शिकत होते. इतके लहान असतानाच माझ्या आजूबाजूला बॉडीगार्ड फिरत होते. मी जेव्हा शाळेत जात होते, तेव्हा एका गाडीमध्ये सर्व बॉडीगार्ड बंदूक घेऊन माझ्या मागे येत होते. शाळेतील सर्वांना असे वाटत होते की, 'हे काय होत आहे?' या गोष्टींना वैतागून मी मी एकदा माझ्या आईला सांगितले होते, की मी यापुढे शाळेत जाणार नाही जो पर्यंत हे सर्व थांबणार नाही तोपर्यंत मी पुन्हा शाळेत पाऊल ठेवणार नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं ते मला तेव्हा खऱ्या अर्थाने समजलं." कॉलेजबद्दल बोलताना सोनाक्षी म्हणाली, "मी मुद्दाम माझ्या घरापासून खूप लांब असणारे कॉलेज निवडले. त्याचे कारण मला ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. मला स्वतंत्रपणे मोठे व्हायचे होते.'
सोनाक्षीने नुकतेच दिग्दर्शिका जोया अख्तरसोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. तसेच ती लवकरच थोर समाजसेविका सुंदरबेन जेठा मधारपाऱ्या यांच्या भूमिकेत 'भूज- द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटामध्ये काम करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.