Who Killed Moosewala: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हा आज जगात नाही. तरीही त्याच्या लोकप्रियतेत कसलीच कमी आलेली नाही. सिद्धू मुसेवालाची हत्या कोणी, का, आणि कशासाठी केली ? असे अनेक प्रश्न आजही चाहत्यांच्या मनात आहे. मात्र लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी याआधीच पुढे येऊन या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
आजही गायकाची फॅन फॉलोइंग तितकीच आहे. त्याच्या हत्येला इतके महिने उलटले असले तरीही त्याचे नाव सोशल मीडियावर कधीही ट्रेंड होत असते. मात्र आता सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन हे सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागील कहाणी मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे.
पत्रकार जुपिंदरजीत सिंग यांनी 'हू किल्ड मूसेवाला' हे पुस्तक लिहिले आहे. आता याच पुस्तकावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
या पुस्तकात प्रामुख्याने सिद्धू मूसवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शुभदीप सिंग सिद्धूच्या आयुष्यातील गुन्हेगारी, लोकप्रियता आणि शोकांतिका आणि त्याच्या प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.
'अंधाधुन', 'मोनिका ओ माय डार्लिंग' आणि 'स्कूप' यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मॅचबॉक्स शॉट्स या प्रोडक्शन हाऊसचे सिनेनिर्माते श्रीराम राघवन यांनी 'हू किल्ड मूसेवाला?' या पुस्तकाचे राईट्स विकत घेतले आहेत.
आता श्रीराम राघवन या पुस्तकावर चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत, ज्यामध्ये सिद्धू मूसेवालाच्या जन्मापासून ते हत्येपर्यंतच्या अनेक गोष्टीचा उलगडा करण्यात येणार आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांसाठी ही बातमी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही.
सिद्धू मुसेवालाची गेल्या वर्षी मे महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडही हादरले होते. वयाच्या 28 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत खूप नाव कमावले होते.
दोन गँगमध्ये सुरू झालेल्या युद्धात सिद्धू मूसेवाला यांची हत्या झाली. त्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत अनेक खुलासे झाले आहेत. आता 'हू किल्ड मूसेवाला?' या सिनेमात अनेक रहस्य उघड होतील अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.