‘Whoever insults a woman, her downfall…’, Kangana Ranaut’s old statement on Sanjay Raut goes viral! Google
मनोरंजन

'जो स्त्रीचा अपमान करेल...'; संजय राऊतांवरील कंगनाचं वक्तव्य Viral

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळाल्या.

प्रणाली मोरे

शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांना ईडीनं(ED) ताब्यात घेतल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळाल्या. त्यातच आता कंगना रनौतचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. बोललं जात आहे की कंगनाचा हा व्हिडीओ संजय राऊतांवर हल्लाबोल आहे. कंगना रनौतने(Kangana Ranaut) आपल्या 'थलाई'च्या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर इन्स्टा स्टोरीत अपलोड केला आहे. ‘(Whoever insults a woman, her downfall…’, Kangana Ranaut’s old statement on Sanjay Raut goes viral!)

या व्हिडीओत कंगना रनौत कोणाचेही नाव न घता संजय राऊतांवर निशाणा साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ १ वर्ष जुना आहे,जेव्हा मुंबईत कंगना रनौतवर निशाणा साधत संजय राऊत यांनी तिखट वक्तव्य केली होती आणि राज्य सरकारच्या मदतीनं तिच्या घराची तोडफोड केली होती. आता पुन्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कंगना रनौत या व्हिडीत बोलताना दिसत आहे की,''तुम्ही आपला इतिहास नीट पहा. ज्यानं स्त्रीचा अपमान केला आहे,त्याचा विनाश झालाच आहे. इतिहास याला साक्षीदार आहे. रावणानं सीतेचा अपमान केला होता,कौरवांनी दौपदीचा.आता माझी तुलना या देवीसमान स्त्रियांसोबत होऊ शकत नाही पण मी देखील माझ्या सम्मानासाठी बोलले होते. मी कोणासाठी वाटेत अडचणी नव्हत्या निर्माण केल्या,मी फक्त माझ्या आत्मसम्मानाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता''.

कंगना रनौत पुढे म्हणाली होती की,''मी स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता,पण तरीदेखील माझा अपमान केला गेला. मी जे व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केलं होतं,त्यात मी तेच बोलले होते,ज्याच्यावर माझा विश्वास आहे. जेव्हा-जेव्हा तुम्ही स्त्रियांचा अपमान कराल तेव्हा-तेव्हा तुम्हाला शिक्षा ही होणारच''.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रनौतने शिवसेनेवर बोट ठेवलं होतं. तेव्हा संजय राऊत कंगना रनौत विरोधात खूप बोलले होते. अगदी 'हरामखोर मुलगी आहे कंगना रनौत' अशा भाषेत देखील संजय राऊत बोलले होते. पण त्या वक्तव्यानंतर वाद चिघळतोय हे लक्षात येताच राऊत थोडे नरमले होते आणि त्या शब्दाचा अर्थ नॉटी,बेईमान या अर्थाने घ्यावा असं म्हणाले होते. त्यावेळी संजय राऊत आणि कंगना विरोधात ट्वीटर वॉर देखील छेडलं गेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT