हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ(Will Smith) यानं 'अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅन्ड सायन्सेस' च्या सदस्यत्वाचा त्याग करत राजीनामा दिला आहे. ऑस्कर पुरस्कारसोहळ्याचा सूत्रसंचालक ख्रिस रॉकला(Chris ROck) कानाखाली मारल्याप्रकरणानंतर मोठा वाद निर्माण झाल्यामुळे विल स्मिथनं अॅकॅडमीचा राजीनामा देण्याचं मोठं पाऊल उचललं आहे. विल स्मिथनं शुक्रवारी १ एप्रिल २०२२ रोजी आपला राजीनामा अॅकॅडमीकडे पाठवल्यानंतर पुन्हा एकदा ख्रिस रॉकची माफी मागितली आहे. राजीनामा दिल्यानंतर विलला ऑस्कर पुरस्कार परत द्यावा लागणार नसला,किंवा पुरस्कार सोहळ्याचा भागही यापुढे बनता येणार असलं तरी अॅकॅडमीचं सदस्यत्व गमावल्याुळे तो ऑस्कर पुरस्कारसाठी सदस्यांना मतदानाचा जो अधिकार असतो तो मात्र त्यानं गमावला आहे. ज्याचा फटका त्याला नक्कीच भविष्यात बसणार आहे.
ख्रिसचा माफीनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानं त्यात म्हटलं आहे,''मी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अॅन्ड सायन्सेस च्या सदस्यत्वपदाचा राजीनामा देत आहे, तसंच,मी केलेल्या अक्षम्य कृत्याबद्दल माझ्यावर जी कारवाई केली जाईल त्याच्या परिणामांचा मी स्विकार करेन''. त्यानं पुढे लिहिलं आहे,''९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान माझ्याकडून जे घडलं ते खरंच सगळ्यांसाठी धक्कादायक,अक्षम्य आणि खेदजनक कृत्य होतं. माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे अनेकांना मी त्रास दिला आहे. यात माझं कुटुंब,मित्रपरिवार आणि इतर इनेक इंडस्ट्रीतील माझे प्रियगण सामिल आहेत. त्याचबरोबर जगभरात जे प्रेक्षक,माझे चाहते हा सोहळा पाहत होते त्यांचं मन देखील मी दुखावलं आहे''.
काय घडलं होतं ऑस्कर सोहळ्यात?
ऑस्कर २०२२ च्या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची तिच्या केसांवरुन सूत्रसंचालक ख्रिस रॉक यानं खिल्ली उडवली. जेडा केसांच्या आजारानं त्रस्त आहे. या आजारामुळे तिला आपले सर्व केस गमवावे लागले आहेत. त्यामुळे तिच्या केसांवरुन ख्रिस रॉकनं विनोद केल्यानंतर विल स्मिथ मंचावर गेला अन् त्यानं भर ऑस्कर सोहळ्यात ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. हे इतकं सगळं अचानक घडलं की सभागृहातील मान्यवरच नाही तर टेलीव्हिजनवर हा सोहळा पाहणारे प्रेक्षकवर्गही हैराण झाले होते.
या घटनेनंतर ऑस्कर कमिटीनं विलला पुरस्कार सोहळ्यातून जाण्यास सांगितले होते पण त्यानं तसं करण्यास नकार दिला,आणि आपल्या खुर्चीवर बसून राहिला. एवढंच नाही तर विल स्मिथला त्याच्या 'किंग रिचर्ड' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यानं मंचावर जाऊन पाच मिनिटांचे भाषणही केले. तो भावूकही झालेला सर्वांनी पाहिला. त्यानं केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली. पण तेव्हा त्यानं ख्रिस रॉकची मात्र वैयक्तिक माफी मागितली नाही. तसंच,सोहळ्यानंतरही विल आपल्या पत्नीसोबत पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा करताना दिसला. तसंच,त्यानंतरचे काही व्हिडीओ व्हायरल झाले त्यात विल स्मिथच्या चेहऱ्यावर आपल्या हातून घडलेल्या चुकीसाठी जरादेखील संकोच पहायला मिळाला नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.