Captain Miller Event Controversy: धनुषचा आगामी चित्रपट 'कॅप्टन मिलर' 12 जानेवारीला पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम 3 जानेवारीला चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये झाला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला तिचा विनयभंग झाल्याचा आरोप करत एका माणसाला मारहाण करताना दिसत आहे. अँकर ऐश्वर्या रगुपती असे या महिलेचे नाव आहे. वाचा संपूर्ण प्रकरण.
3 जानेवारी रोजी, धनुष आणि 'कॅप्टन मिलर'ची संपूर्ण टीम चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित प्री-रिलीझ कार्यक्रमात सहभागी झाली होती.
'कॅप्टन मिलर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धनुषचे फॅन्स मोठ्या संख्येने जमले होते. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिलांच्या भोवती गर्दी जमलेली दिसते.
होस्ट ऐश्वर्या रगुपती म्हणून ओळखली जाणारी महिला कार्यक्रमात तिचा विनयभंग करणाऱ्या पुरुषाला मारहाण करताना दिसतेय. तिने त्या व्यक्तीच्या कानफडात लगावली आणि तिच्या पाया पडायला सांगितले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका ट्विटर युजरने या व्हिडीओवर लिहिलंय की, "प्रिय #कॅप्टनमिलर टीम, भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी.. कृपया चाहत्यांच्या पासची खात्री करा. जर तुमचे चाहते कमी असतील, तर मोठ्या टप्प्यात फुकट पास आयोजित करू नका. मोफत पास दिल्याने अशा प्रकारच्या गोष्टी होतील." असं ट्विट त्याने केलंय.
ऐश्वर्याने याविषयी सोशल मीडियावर लिहिले की, "त्या गर्दीत एका व्यक्तीने माझा छळ केला. मी लगेच त्याचा प्रतिकार केला. आणि मी त्याला सोडलं नाही. बेदम मारलं. तो पळून गेला. पण मी त्याचा पाठलाग केला. माझ्यासोबत असं होणं मला मान्य नव्हतं. महिलांच्या शरीराचा भाग पकडण्याची त्याची हिम्मत कशी झाली. मी ओरडून त्याच्यावर हल्ला केला."
तिने पुढे लिहिले, "माझ्या आजूबाजूला चांगले लोक आहेत. याशिवाय मला जगात खूप दयाळू आणि आदरणीय माणसं भेटली आहेत. परंतु मला या काही टक्के राक्षसांच्या आसपास राहण्याची भीती वाटते!!!"
आता या गंभीर प्रकरणावर धनुष आणि पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.