ही ट्यून विसाव्या शतकातील लोकांसाठी जणू गजरच असायचा. आजही रेडिओच्या भक्तीगीतं आणि भावगीतांनी अनेकांची सकाळ प्रसन्नमय होते. विसाव्या शतकासाठीची ती एक देणगी होती. कानात हेडफोन टाकून तासन् तास क्रिकेटच्या कसोटी मॅचची कॉमेट्री ऐकण्याची मजा रेडिओने आपल्याला दिली. रात्रीच्या वेळी शेतीचे कार्यक्रम अन् बातम्या ऐकण्यासाठी अर्धा गाव जमायला रेडिओ कारणीभूत होता. आज पुन्हा ते दिवस आठवतात. कोट्यवधी लोकांच्या मनातली 'मन की बात' करणाऱ्या रेडिओचा आज जागतिक दिन. त्यानिमित्ताने रेडिओसंदर्भातील काही खास गोष्टी जाणून घेऊयात... (World Radio Day)
आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र.. सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे झाली आहेत… असा निवेदिकेचा मंजूळ स्वर आणि आकाशवाणीची ती धून कानी पडायची आणि आपली सकाळ व्हायची..... घनश्याम सुंदरा,श्रीधरा अरुणोदय झाला…अशा भक्तीमय गाण्यांनी सगळं वातावरण प्रसन्न व्हायचं. त्याकाळी प्रत्येकाचा दिवस हा रेडिओच्या वेळेनुसार चालायचा. स्वांतत्र्यानंतर रेडिओ हेच एकमेव माध्यम असं होतं जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकत होतं. भारताला आधुनिक जगाच्या उंबरठ्यावर पोहचवण्यासाठी रेडिओचा मोठा वाटाये.
पहिला जागतिक रेडिओ दिन 2013 मध्ये साजरा करण्यात आला. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचं पहिल्यांदा प्रसारण झालं. त्यामुळं 13 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो... जगातला पहिला रेडिओ हा 'गॅलीलिओ' ने 1895 मध्ये बनवला होता. त्यानंतर 1920 चे दशक येता येता रेडिओला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झालं. तसंच 1950 पर्यंत रेडिओ लोकप्रिय झाला होता. भारतात रेडिओची सुरुवात 1920 च्या दशकात झाली. 23 जुलै 1927 रोजी मुंबईतून रेडिओ प्रसारण सेवा सुरू झाली.
तसेच 'इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनी लिमिटेड'ने मुंबई आणि कोलकता येथे रेडिओ स्टेशन सुरू केलं. परंतु 1930 मध्ये ही कंपनी बंद पडली. त्यानंतर सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यात घेत त्याला 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टींग सर्विस' असं नाव दिलं. त्यानंतर 8 जून 1936 मध्ये त्यांचं 'ऑल इंडीया रेडीओ' असे नामकरण करण्यात आलं. परत 1956 मध्ये पुन्हा याचं नाव बदलत 'आकाशवाणी' करण्यात आलं. हळू हळू आकाशवाणीचं जाळं देशभर पसरलं. आज 23 भाषांमध्ये 415 रेडिओ स्टेशनसह 'ऑल इंडीया रेडीओ' ही जगातल्या सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवेपैकी एक बनलीये. तसंच 2001 मध्ये भारतात खासगी रेडिओ स्टेशनलासुद्धा सुरुवात झाली होती.
माहिती, संवाद आणि गाण्यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग केला जायचा. माहितीच्या देवाणघेवाण आणि जगभरातील लोकांना शिक्षित करण्यासाठी रेडिओने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलीय. रेडिओ पत्रकारांसाठी एक व्यासपीठ असायचं.... परंतु टेलिव्हिजन आणि मोबाईलचा शोध लागल्यानंतर रेडिओचा वापर कमी झाला. मात्र, अजूनही रेडिओचं महत्त्व कमी झालेलं नाही. रेडिओची भाषा बदलली. निवेदकांची जागा आता 'RJ'ने घेतली.
शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजीची जोड असलेली भाषा आता रेडिओवर ऐकू येते. त्याचबरोबर आकाशवाणीने आता स्थानिक केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतलायं. आजही रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली आणि स्वस्त साधन मानलं जातं. प्रवास करताना आपल्याला बोर झालं की आपल्याला साथ ती रेडिओचीच असते. रेडिओ बदद्लची आपुलकी जनमानसांत परत जागी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांचा आवडता 'मन की बात' हा कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून घेतला. अशी ही रेडिओची कहाणी....
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.