अभिनेत्री यामी गौतमला Yami Gautam अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ED समन्स बजावले आहेत. परदेशी चलन नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने यामीला दुसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा ईडीने यामीला समन्स बजावले होते. मात्र लॉकडाउनचे कारण देत तिने चौकशीला हजर राहण्यास टाळलं होतं. परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनप्रकरणी यामी सध्या ईडीच्या रडारवर आहे. यामीला समन्स पाठवून मुंबईतील ईडीच्या परिमंडळ 2 च्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. (Yami Gautam summoned by ED in connection with money laundering case)
परदेशी कॉन्ट्रॅक्टद्वारे तिला एक कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. ती तिने जाहीर केली नाही. तसेच त्याबाबत फेमाच्या कायद्याचे पालन केले नसल्यामुळे तिला समन्स बजावण्यात आल्याचे ईडीच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. तिच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्यानंतर तिचे खाते असलेल्या खासगी बँकेने नियमानुसार याबाबतची माहिती केंद्रीय यंत्रणांना दिली. साधारण एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम तिच्या खात्यात जमा झाल्याचे ईडीला सांगण्यात आले. त्यानुसार गेल्यावर्षी ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली होती. त्यासाठी तिला गेल्यावर्षी पहिला समन्स पाठवला होता. पण कोरोना काळात देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ती या समन्सला उपस्थित राहू शकली नाही. आता सर्व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ईडीने पुन्हा तिला दुसरा समन्स बजावून चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे.
यामीने 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने आतापर्यंत 'काबिल', 'बदलापूर', 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. यामीने जून महिन्यात 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्नगाठ बांधली. हिमाचलमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं. यामी-आदित्यच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर यामीने तिच्या आगामी 'अ थर्सडे' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.