यामी गौतम(Yami Gautam) लवकरच 'दसवी'(Dasvi) सिनेमात पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं तिला तुरुंगातील कैद्यांचं जीवन जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. नेटफ्लिक्सवर 'दसवी' हा सिनेमा 7 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचा बराचसा भाग हा आग्रा सेंट्रल जेलमध्ये शूट करण्यात आला आहे. नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंग खास आग्रा येथील सेंट्रल जेलमधीस कैद्यांसाठी ठेवण्यात आलं होतं. तेव्हा अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) सोबत यामी गौतम आणि निमरत कौर या अभिनेत्री देखील आवर्जुन त्या स्क्रीनिंगसाठी हजर राहिल्या होत्या. त्यावेळी तब्बल २००० कैद्यांनी एकत्रितपणे 'दसवी' हा सिनेमा पाहिला होता.
त्यावेळी सिनेमाचं स्क्रीनिंग झाल्यानंतर तेथे उपस्थित अनेक कैद्यांनी स्टार्सकडून त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी तर कुणी सिनेमाचं कौतूक करण्यासाठी सिनेमातील कलाकारांना येऊन भेटले. त्यावेळचा एक अनुभव यामीनं आपल्या मुलाखतीत शेअर केला आहे. यामी म्हणाली,''जेलमधला तो कैदी आजही माझ्या लख्खं लक्षात आहे. त्याची मला समजलेली स्टोरी मी माझ्यासोबत घेऊन आलीय. खरंतर,आम्ही प्रत्यक्षात भेटलो नाही. त्यानं त्याचं एक रजिस्टर माझी स्वाक्षरी घेण्यासाठी माझ्याकडे पाठवलं होतं. त्यात त्याच्या मुलीचा फोटो होता. त्याच्या किशोरवयीन मुलीसाठी त्यानं एक नोट लिहिली होती त्या रजिस्टरमध्ये. त्याच्यात बरेचसे करिअर ऑप्शन्स लिहिले होते. जर तिला IAS अधिकारी बनायचं असेल तर तिला १२ वी इयत्तेत इतके गुण आणावे लागतील...आणि जर तिला आर्मीमध्ये जायचं असेल तर नेमकी काय प्रक्रिया असते. जर तिला बॅंकेत अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. ..हे सगळं तुरुंगातील लायब्ररीमध्ये घडलं. म्हणजे तिथे असताना ते रजिस्टर माझ्याजवळ आलं. आणि मला या सगळ्या गोष्टींचा छडा लागला. तेव्हा मला देखील लगेच क्लिक झालं की त्या कैद्यानं ही सगळी माहिती लायब्ररीमधील पुस्कांमधूनच जमा केली होती''.
यामी पुढे म्हणाली,''कैद्यांसोबत बोलायची संधी मिळाली नाही. पण त्या कैद्यांविषयीची खरी कल्पना मात्र ते रजिस्टर देऊन गेलं''. ती म्हणाली,''आपल्याला एखादा माणूस तुरुंगात कैद्याचं जीवन जगतोय म्हणजे तो चुकीचा,वाईट असंच कायम वाटत राहतं. पण त्यांनी तो गुन्हा करण्यामागे एक वेगळी स्टोरी असू शकतो,त्यांच्या खऱ्या आयुष्याची. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून,एक कलाकार म्हणून अशा अनेक स्टोरीज् बरंच काही शिकवून जातात. आपल्याला कल्पनाच नसते पण आपल्या आजुबाजूला कितीतरी गोष्टी घडत असतात त्याची''.
दसवी हा सामाजिक विषयाला विनोदाची जोड देत शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगणारा सिनेमा आहे. अभिषेक बच्चनच्या भोवती सिनेमाचं कथानक फिरतं. गावातला अशिक्षित राजकारणी,भ्रष्टाचाराच्या आरोपानं जेलमध्ये जातो,तिथे कामचुकारपणा करण्यासाठी शिक्षण घ्यायला लागतो आणि दहावीचा फॉर्म भरतो असा एकंदरीत स्टोरीचा ग्राफ आहे. यात यामीनं हरयाणवी पोलिस अधिकारी साकारली आहे तर निमरत कौरनं अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. जी पुढे नवरा जेलमध्ये गेल्यामुळे त्याची राजकीय गादी सांभाळते आणि थेट मुख्यमंत्रीच बनते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.