yashraj mukhate new video on deepika padukone fifa appearance pathan Controversy watch viral video rak94 
मनोरंजन

Deepika Padukone : 'रसोडे में कौन था?' फेम यशराजचा दीपिकाच्या डायलॉगवरील Video Viral, एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी चित्रपट ‘पठाण’ हा सध्या सातत्यान चर्चेत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरून वाद पेटला आहे. यादरम्यान दिपीकाच्या एका डायलॉगवर 'रसोडे मे कौन था?' मीम फेम यशराज मुखाटेने नवीन व्हिडीओ बनवला आहे.

कोकिला बेनच्या 'रसोडे में कौन था' च्या रिमिक्स आवृत्तीनंतर यशराज सर्वांना माहिती झाला होता. यशराज मुखाटेने या डायलॉगचे केलेले मजेशीर रिमिक्स इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले होते. आता यशराजने एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. या नव्या रीलमध्ये त्याने दीपीकाने पोस्ट केल्या एका रीलचं रिमीक्स पोस्ट केलं आहे. या व्हिडीओला इंस्टाग्रामवर लोक मोठ्या संख्येने लाइक करत आहेत. पोस्ट केल्याच्या दोन तासांतच ६४ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच नेटकरी यावर भरून प्रतिक्रिया देखील देत आहेत.

अभिनेती दीपिका पदुकोणने नुकतेच पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचं कतार येथे जाऊन अनावारण केले होते. यादरम्यानचा अनुभव दीपिका या व्हिडीओमध्ये सांगत आहे. आणि याच व्हिडीओचं रिमीक्स यशराजने केलं आहे. यामध्ये ती तिनं या कार्यक्रमात घातलेल्या कपड्यांचं वर्णन करत आहे.

यशराज मुखाटे कोन आहे?

संगीत निर्माता असेलेला यशराज मुखटे हा सध्या सोशल मीडिया स्टार असून तो फेमस डायलॉग मध्ये संगीत मिक्स करून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबादमध्ये राहणारा यशराज हा व्यवसायाने इंजिनिअर आहे. यशराज हा त्याच्या युनिक रिमीक्स गाण्यांसाठी प्रसिध्द आहे.

इंटरनेटवर तुफान लोकप्रिय असलेल्या यशराजचे याआधी देखील रिमीक्स व्हायरल झाले आहेत. यामध्ये शहनाज गिलच्या 'त्वडा कुट्टा टॉमी' आणि कोकिला बेनच्या 'रसोदे में कौन था','यहां पे हमारी पार्टी हो रही है' या डायलॉग्जचे रिमीक्स खास प्रसिद्ध आहेत. इंस्टाग्रावर यशराजची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT