Year End 2022 Bollywood Controversies Esakal
मनोरंजन

Year End 2022: बॉलीवूडमध्ये घडलं पण जगभर वाजलं..वादग्रस्त घटनांवर टाका एक नजर..

बॉलीवूडसाठी 2022 हे साल तसं पहायला गेलं तर खूपच अडचणींचं राहिलं.

प्रणाली मोरे

Year End 2022 : बघता बघता २०२२ हे वर्षं देखील संपत आहे.‌ या वर्षी बॉलीवूडमधील कलाकार अन् चित्रपट चर्चेत राहिले ते वादगस्त विधानं,कथानक आणि अनेक कारणांमुळे.. चला,एक नजर टाकूया बॉलूवडमध्ये घडलेल्या अन् जगभर वाजलेल्या त्या वादांवर.(Year End 2022 Bollywood Controversies)

काश्मीर फाइल्स

हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर आधारित होता. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. मात्र, हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटात दाखवण्यात आलेली दृश्ये आणि काश्मिरी पंडितांची स्थिती अनेकांना योग्य वाटली नाही. राजकारणातही या चित्रपटावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जबरदस्त वाद झाले होते.

काली

काली या डॉक्युमेन्ट्रीच्या एका पोस्टरवरून इतका वाद झाला होता की. या पोस्टरवर प्रत्यक्षात, हिंदू देवता काली माता सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती आणि पोस्टरमध्ये LGBTQ ध्वजही दाखवण्यात आला होता. हे पोस्टर 2 जुलै 2022 रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, त्यानंतर दिग्दर्शिकेला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली .हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल पोलीस तक्रारही करण्यात आली.

रणवीर सिंग न्यूड फोटोशूट

रणवीर सिंग न्यूड फोटोशूट. 22 जुलै रोजी हे प्रकरण पेटलं, जेव्हा सोशल मीडियावर रणवीर सिंगचे न्यूड फोटो सर्वत्र दिसू लागले. याप्रकरणी दोन प्रकारची मते समोर येत होती. असे काही लोक होते जे रणवीरच्या फोटोशूटला बोल्ड आणि फेमिनिझमशी जोडताना दिसत होते. त्याच वेळी, काही लोक त्याच्या या फोटोशूटच्या विरोधात होते. इतकेच नव्हेतर तर रणवीर सिंगच्या विरोधात तक्रारही केली गेली होती.

कित्ता सुदीप आणि अजय देवगण

किच्चा सुदीप याने हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नाही असं विधान ट्विटवर मांडलं होतं . तर अजय देवगणने किच्चा सुदीपला यावरनं सुनावताना त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'किच्चा सुदीप, भावा तुझ्या मते जर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. तर तुझ्या मातृभाषेत तयार झालेले सिनेमे तुम्ही हिंदीमध्ये का डब करून रिलीज करता? हिंदी ही आमची मातृभाषा आहेच आणि राष्ट्रीय भाषा देखील आहे... आणि कायम राहील...जन गण मन..' असं म्हणत त्यानं किच्चा सुदीपला टॅग केलं होतं.

रिचा चढ्ढा

रिचाने भारतीय लष्कराबद्दल एक वादग्रस्त ट्विट केल आणि ते चांगलच गाजलं. या ट्विटमुळे तिला ट्रोल गेलं आणि अनेक स्टार्स तिच्या विरोधात गेले.'गलवान सेज हाय' असं ट्विट रिचा चढ्ढानं केलं होत .या ट्वीटवरुन बराच वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या ट्वीटवरुन रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केला असं म्हटलं होतं.

अक्षय कुमार

अक्षय कुमार विमल पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसला आणि परिणामी, तंबाखूला मान्यता दिल्याबद्दल त्याला वेठीस धरले. अक्षय कुमारने तंबाखूचा प्रचार न करण्याचे आश्वासन दिले. तरीही

त्याने अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत जाहिरातीत काम केले होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर, अक्षय कुमारने करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या चाहत्यांची माफी मागितली.

पठाण - केसरी बिकनी

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटातील ' बेशरम रंग ' या गाण्यांमध्ये दीपिका पदुकोणने घातलेली केसरी रंगाची बिकिनी यावरनं जोरदार वाद पेटला आहे,जो थांबायचं नावच घेत नाही. आता यावर सेन्सॉरनं देखील आक्षेप घेत बदल सुचवले आहेत. केसरी रंगाच्या बिकनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या असा आरोप केला जात आहे, इतकेच नव्हेतर तर यामुळे चित्रपट बॉयकॉटची मागणी होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT