Year End 2022 Bollywood Movie box office collection Esakal
मनोरंजन

Year End 2022: करोडो रुपये खर्चूनही दणक्यात आपटलेले बॉलीवूडचे बिग बजेट सिनेमा

2022 हे वर्ष बॉलीवूडसाठी फारसं चांगलं राहिलेलं नाही..या वर्षांत कमी बजेटचे सिनेमे चालले पण मोठ्या बजेटचे सिनेमे पुरते फसले.

प्रणाली मोरे

Year End 2022: जवळपास दोन वर्ष या जगाला करोना या महामारीच्या ग्रहणानं ग्रासल होत. अनेक निर्बंध आणि लॉकडाऊनच्या दोन वर्षांच्या काळानंतर 2022 या सालामध्ये बॉलीवूडमधील अनेक बिग बजेट सिनेमा रिलीज होऊ लागले.

मात्र 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी निराशाजनक ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण या वर्षात मोठी स्टार कास्ट आणि मोठा खर्च करून तसंच जोरदार प्रमोशन करूनही ज्या सिनेमांची हिट होण्याची अपेक्षा होती ते सिनेमे बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले.

बिग बजेट म्हणजेच जवळपास 100 कोटीहून अधिक खर्च करून तयार करण्यात आलेले मात्र बॉक्स ऑफिसवर पुरते फेल ठरलेले सिनेमे कोणते हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Year End 2022 Bollywood Movie box office collection)

शमशेरा

कधीकधी मोठा अभिनेता असो किंवा एखादं मोठ प्रोडक्शन हाऊस सिनेमा हीट ठरेलच याची शाश्वती नसते. असंच काहीसं घडलं 'शमशेरा' या सिनेमाच्या बाबतीत. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी या सिनेमाची जोरदार चर्चा होती मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमात फारशी कमाई करू शकलेला नाही. रणबीर कपूरची दुहेरी भूमिका असलेल्या शमशेरावर जवळपास 183 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने केवळ 65 ते 75 कोटींचा गल्ला जमवला.

सम्राट पृथ्वीराज

जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांनी मोठी पसंती मिळाल्याचं आजवर पाहिला मिळालंय. मात्र याला अपवाद ठरला तो म्हणजे अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट. हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात फोल ठरला. अभिनेता अक्षय कुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमावर तब्बल 300 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 64.62 कोटी एवढी कमाई केली.

लाल सिंह चड्ढा

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा सिनेमा म्हटलं तर प्रेक्षकांना त्याच्या सिनेमाकडनं भरपूर अपेक्षा असतात. आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र बहुप्रतिक्षित असा हा सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांच्या पदरी निराशा पडली आणि हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर आपटला. या सिनेमाची निर्मिती 180 कोटींच्या तगड्या बजेटमध्ये करण्यात आली होती. परंतु आतापर्यंत केवळ 50 कोटी या सिनेमाने कमावले आहेत. सिनेमाच्या अपयशानंतरच आमिर खानने आता काही काळ बॉलीवूडमधून ब्रेक घेतला आहे.

राधे श्याम

'बाहुबली' फेम प्रभासच्या 'राधे श्याम' या सिनेमाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. 2022 या वर्षातील हा सगळ्यात जास्त बजेट असलेला सिनेमा म्हणता येईल. मात्र प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला. प्रभासचा हा रोमँटिक ड्रामा प्रेक्षकांच्या काही पसंतीस पडला नाही. अंदाजे 300-350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त 120 कोटी रुपये कमावले.

धाकड

शंभर कोटींच्या आतील धाकड हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात पुरता अपयशी ठरला. शिवाय या सिनेमाकडून कंगनाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या या सिनेमासाठी 85 कोटी खर्च करण्यात आले होते. तर या सिनेमाने केवळ 3.77 कोटी रुपयांची कमाई केली.

या सिनेमांसोबतच मोठी स्टार कास्ट असलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'विक्रम वेधा'. हृतिक रोशन आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तसाच रणवीर सिंगचा जयेश भाई जोरदार, कटरीना कैफचा फोनवरून, अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि वर्षा अखेरीस प्रदर्शित झालेला रणवीर सिंगचा सर्कस हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT