Hrishikesh Pandey  
मनोरंजन

लग्नाच्या १७ वर्षांनंतर 'CID' फेम हृषिकेशचा घटस्फोट; म्हणाला, 'इतकी वर्षे गप्प होतो कारण..'

गेल्या सात वर्षांपासून हृषिकेश आणि त्याची पत्नी वेगळे राहत आहेत.

स्वाती वेमूल

प्रसिद्धी टीव्ही अभिनेता हृषिकेश पांडेने Hrishikesh Pandey पत्नी त्रिशा दुबाशला घटस्फोट दिला. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत. हृषिकेशने 'सीआयडी' CID, 'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishta Kya Kehlata Hai, 'जगजननी माँ वैष्णो देवी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्रिशा आणि हृषिकेशने २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र संसारातील वाढत्या वादांमुळे हे दोघं २०१४ पासून वेगळे राहू लागले. त्यानंतर गेल्या महिन्यात या दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. (Yeh Rishta Kya Kehlata Hai actor Hrishikesh Pandey opens up about divorce)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृषिकेश त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल व्यक्त झाला. “जसजसा वेळ जाऊ लागला, तसतसं आम्हाला जाणवू लागलं की आमच्यात खूप मतभेद होत आहेत. एक जोडपं म्हणून आमच्यात समतोलच राखला जात नाहीये. म्हणून आम्ही गोष्टी अधिक चिघळण्याआधी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मी इतकी वर्षे या विषयावर गप्प होतो, कारण मी नेहमीच माझ्या खासगी आयुष्याचा आदर केला. आता घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने मी त्यावर व्यक्त होऊ शकतो. सुदैवाने, आम्ही एकमेकांच्या सहमतीने घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडली. मी तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा आभारी आहे, की त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि आमच्या निर्णयाचा स्वीकार केला”, असं तो म्हणाला.

घटस्फोटानंतर हृषिकेशला त्यांच्या १२ वर्षीय दक्षय या मुलाचा ताबा मिळाला. मात्र कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुलाची हॉस्टेलमध्ये राहायची सोय केल्याचं त्याने सांगितलं. हृषिकेशने इतके वर्षे मौन का बाळगलं याविषयी तो म्हणाला, "माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गप्प राहण्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे माझा मुलगा. इतक्या लहान वयात त्याने माझ्या घटस्फोटाबाबतच्या बातम्या वाचाव्यात अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. तो आता १२ वर्षांचा आहे आणि आम्हाला आता तो समजून घेऊ शकतो. हे सर्व आव्हानात्मक होतं, पण आता त्या सर्व गोष्टींतून मी बाहेर पडलोय.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT