You tuber arrested for insulting Vijay Deverakonda, what is the actual case? know details SAKAL
मनोरंजन

Vijay Deverakonda: विजय देवराकोंडाचा अपमान केल्याप्रकरणी तरुणाला अटक, नेमकं प्रकरण काय?

Devendra Jadhav

Vijay Deverakonda News: विजय देवरकोंडा हा भारतीय मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता. विजय कायमच विविध माध्यमांमधून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. विजयबद्दल एक महत्वाची माहिती समोर येतेय. विजयने एका युट्यूब चॅनलविरोधात खोटी माहिती पसरवल्याबद्दल तक्रार दाखल केलीय. काय झालंय नेमकं? वाचा सविस्तर.

विजयचा अपमान करणाऱ्या तरुणाला अटक

हैदराबादच्या सायबर क्राईम पोलिसांनी विजयला उद्देशून चुकीची माहिती आणि अपमानजनक टिप्पणी असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी जबाबदार व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर तो व्हिडिओ लगेचच युट्यूब चॅनल वरुन काढून टाकण्यात आला.

वेंकट किरण हा यूट्यूबर 'सिनेपोलीस' नावाचं चॅनल चालवत होता. या चॅनलच्या माध्यमातून विजय आणि त्याच्या एका महिला सह-कलाकारांबद्दल अश्लील आणि अपमानजनक बातम्या पसरवल्या जात होत्या. त्यानंतर विजयच्या टीमने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल केली. आणि वेंकटला अटक करण्यात आली.

विजय आणि त्याच्या सह- अभिनेत्रीविषयी असभ्य व्हिडीओ

विजयच्या टीमच्या एका सदस्याने हिंदुस्तान टाईम्सला ही माहिती दिली, "काही दिवसांपूर्वी वेंकटने त्याच्या चॅनलच्या माध्यमातून विजय आणि अन्य एका अभिनेत्रीशी संबंधित असभ्य बातम्या पसरवल्या. या अपमानजनक बातम्यांकडे लक्ष वेधल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. त्यांनी वेंकटचा शोध घेऊन त्याला अटक केली. पुढे त्याला तो व्हिडीओ काढायला लावला आणि त्याला समज देऊन सोडण्यात आले"

विजय देवराकोंडाचं वर्कफ्रंट

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर.. अलीकडेच विजयने सामंथा रुथ प्रभू सोबत 'कुशी' या सिनेमात अभिनय केला.

सध्या विजय दिग्दर्शक परशुराम पेटला यांच्या मार्गदर्शनाखाली 'फॅमिली स्टार' या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत काम करत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून, सध्या त्याचे शूटींग सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansbha Election : महाविकास आघाडीचं ठरेना… अजूनही १७ जागांवर तिढा कायम; फायनल यादी कधी येणार?

सुंदर विषय तरीही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ; प्रियांकाच्या 'पाणी'ने २ दिवसात किती केली कमाई?

Ranji Trophy: 15 Sixes! जम्मू-काश्मीरच्या अब्दुल समदने एकाच सामन्यात ठोकल्या दोन सेंच्युरी, मोठ्या विक्रमालाही गवसणी

Diwali Snack 2024: दिवाळीसाठी बनवा कुरकुरीत अन् स्वादिष्ट मुरमुऱ्यांचा चिवडा, पाहा व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 ऑक्टोबरला भरणार अर्ज

SCROLL FOR NEXT