MLA Rohit Pawar sakal
मराठवाडा

MLA Rohit Pawar : १० वर्षात १० लाख कोटीची गुंतवणूक असलेले उद्योग गुजरातला गेले

वसमतला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवा संवाद मेळावा संपन्न, रोहीत पाटील यांचीही उपस्थिती.

संजय बर्दापुरे

वसमत - मागील १० वर्षात महाराष्ट्रातील १० लाख कोटींची गुंतवणूक असलेले उद्योग गुजरातला गेले.‌ परिणामी महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेऊन कौशल्य मिळवलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना बेरोजगार व्हाव लागलं अशी खंत व्यक्त करुन आमदार रोहीत पवार यांनी आगामी निवडणुकीत लाडकी खुर्चीसाठी जाहिरातबाजी करणार्यां सरकारचे सत्तापरिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी शुक्रवार ता.११ केले.

येथील कृष्ण मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रोहीत पवार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सदस्य रोहीत पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार रोहीत पवार म्हणाले की, कष्टकरी शेतकरी आपल्या मुलांच्या हाताला काम मिळावे यासाठी आटापिटा करुन उच्च शिक्षण देतात.‌ परंतू महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरात मध्ये गेले. नुकताच ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला नँशनल मेरीटन काम्प्लेक्स सेंटर नावाचा उद्योग गुजरातला गेला. या उद्योगात २५० ते ४०० कोटी महाराष्ट्राचे आहेत.

म्हणजेच मोटारसायकल गुजरातला आणि पेट्रोल भरतोय महाराष्ट्र अशी गत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील मुलांना खाजगी नौकरी मिळत नाही.‌ मग हे मुलं सरकारी नौकरी मिळेल या आशेने‌ स्पर्धा परिक्षेची तयारी करतात परंतू या परीक्षेतही भ्रष्टाचार होतात. एक पेपर १० ते २० लाख रुपयाला विकला जातो.

महायुतीचे सरकार हे केवळ जाहिरातबाज सरकार असल्याचे सांगुन या सरकारने मागील दिड महिन्यात ५०० कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केला आहे.‌ सोशल मिडियासाठी ९० कोटी रूपयांच कान्ट्रँक्ट केलं तर लोकांना योजना सांगण्यासाठी एस एमएसवर २३ कोटी रुपये सरकार खर्च करणार असल्याचे रोहीत पवार म्हणाले. सत्तेतील सरकार हे जाहिरातबाज, उधारीबाज व दलालीबाज असल्याचे सांगून या सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करा असे आवाहन केले.‌

तत्पूर्वी साईबाबा मंदिर येथून हजारो युवकांनी दुचाकी रँली काढली.‌ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रँली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचली.‌ प्रस्ताविक संकेत इंगोले यांनी केले. सुत्रसंचलन प्रकाश इंगळे यांनी केले.‌कार्यक्रमाला हजारोंच्या संखेने कार्यकर्ते , युवा कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.

रोहीत पवार आणि रोहीत पाटील यांनी आमदार राजू नवघरे यांचा समाचार घेतला.‌ रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत सँड आणि लँड माफियांचा बँड वाजवा असे म्हणाले तर रोहीत पाटील यांनी शरद पवार व जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी गद्दारी केली त्यांना त्यांनीच उपसलेल्या वाळूत गाडा असे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT