latur  sakal
मराठवाडा

Latur News : लातूरला महायुतीच्या मेळाव्यात एकवटले १४ पक्ष

मराठवाड्यातील लोकसभेच्या आठही जागा जिंकण्याचा एकमुखी निर्धार

सकाळ वृत्तसेवा

लातूर : आगामी लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील लोकसभेच्या आठही जागा जिंकण्याचा निर्धार करीत महायुतीच्या मेळाव्यात रविवारी (ता.१४) भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइंसह १४ पक्ष एकवटले होते. मेळाव्यात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करीत आहेत. त्यांच्यामुळे देशाचा विकास होत असून जगभरात नावलौकिक वाढत आहे. केंद्राप्रमाणे महाराष्ट्रही विकास कामात पुढे घेऊन जाण्यासाठी महायुती निर्माण झाली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात जाऊन महायुती बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यास भाजपचे समन्वय प्रमुख आमदार रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वय प्रमुख आमदार बाबासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. बळवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अफसर शेख, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश भाजपचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर, अॅड. व्यंकट बेद्रे उपस्थित होते.

क्रीडामंत्री बनसोडे म्हणाले, की आगामी निवडणुकीत महायुती मराठवाड्यातील आठही जागा जिंकेल. तुम्ही फक्त केंद्र व राज्याच्या योजना घराघरापर्यंत पोचवा असे आवाहन त्यांनी केले. आमदार कराड म्हणाले, की महायुतीच्या नेतृत्वात राज्यात कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रात विकासाला मोठी गती मिळाली आहे. महायुतीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. महायुतीतील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे.

सर्वांनी एकत्रितपणे काम करून लोकसभेचा महायुतीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट केले. आमदार पाटील यांनी, देशाला दिशा देणारी लोकसभेची निवडणूक असल्याने सर्वांनी एकत्रित येऊन कामाला लागावे असे आवाहन केले. आमदार पवार यांनी, कार्यकर्त्यांनी संभ्रम बाजूला ठेवून एकदिलाने काम करावे, असे सांगितले. ॲड.जाधव यांनी, देशाचे भवितव्य सुरक्षित राहावे या करिता पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. या करिता आगामी निवडणुकीत मेहनत घेऊ, अशी ग्वाही दिली. मेळाव्याला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT