file photo 
मराठवाडा

नांदेडला कर्जमुक्तीसाठी लागणार ‘एवढे’ कोटी

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील आजपर्यंत दोन लाख १९ हजार ६७८ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी एक हजार ४६१ कोटी लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पात्र खात्यांपैकी सात हजार २७५ खाते आधार जोडणीचे काम शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवारी (ता. सहा) जिल्हाधिकारी कार्यालयात कर्जमुक्तीसंदर्भात बैठक घेतली. या वेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस, अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक गणेश पठारे तसेच विविध बॅंकेचे अधिकारी उपस्थित होते.

दोन लाख १९ हजार ६७८ खातेदार पात्र

शासनाची कर्जमुक्ती योजना संपूर्ण आधारलिंक खात्याशी संबंधित असल्यामुळे आजपर्यंत या योजनेत दोन लाख १९ हजार ६७८ खातेदार शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. यातील दोन लाख १२ हजार ४०३ खाते आधारलिंक झाले आहेत. तर अद्याप सात हजार २७५ कर्जखाती आधारलिंक करणे शिल्लक आहे. यातील एक लाख ८५ हजार ३६८ खात्यांचा डाटा अपलोड करण्याचे काम झाले आहे. या कर्जमाफी योजनेसाठी एक हजार ४६१ कोटी ३६ लाख रुपये लागतील, असा अंदाज बॅंकर्सकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जमाफी योजनेचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (ता. सात) दूरचित्रवाणी संदेशाद्वारे घेणार आहेत.

कर्जखाते आधारलिंक करा - जिल्हाधिकारी 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी संपूर्णत: आधार क्रमांक जोडलेल्या बँक खात्याशी संबंधित आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी बँकेमधील आपले कर्जखाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करावी. ज्या शेतकऱ्यांचे बँक कर्जखाते आधार क्रमांकाशी संलग्न नाहीत, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेशी संपर्क करून आपले आधार क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

अशी आहे कर्जमुक्ती
ता. एक एप्रिल २०१५ ते ता. ३१ मार्च २०१९ पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे, पुर्नगठन करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात ता. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न झालेल्या हप्त्याची रक्कम 2 दोन लाखापर्यंत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठीत कर्ज यांची ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी वैयक्तिक शेतकऱ्याच्या सर्व कर्जखात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तसेच ज्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांकडील ता. एक एप्रिल २०१५ ते ता. ३१  मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात दोन लाखापर्यंत पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल व व्याजासह ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत.

दोन लाख वीस हजार खातेदार पात्र
जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेसाठी आजपर्यंत दोन १९ हजार ६७८ खातेदार पात्र ठरले आहेत. यातील दोन लाख १२ हजार ४०३ खाते आधारलिंक झाले आहेत. उर्वरित सात हजार कर्जखाते लवकरच आधारलिंक होतील.
प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT