durbin 
मराठवाडा

लोकसहभागातून १८ शाळांंनी खरेदी केली दुर्बीण

जगन्नाथ पुरी

सेनगाव(जि. हिंगोली): येथील जिल्‍हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतंर्गत येणाऱ्या १८ प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत स्‍वखर्चातून बुधवारी (ता.११) दुर्बीण खरेदी केली. यामुळे आकाशातील चंद्र, तारे व ग्रह पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तीन शिक्षकांना दुर्बीणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आकाशातील चंद्र, तारे व विविध ग्रहाविषयी विशेष आकर्षण असते. त्याअनुषंगाने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून दुर्बीण खरेदीसाठी शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम दिले आहे. परंतु, हा निधी अपुरा पडत असल्याने सेनगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळा व केंद्रातंर्गत येणाऱ्या १८ शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत स्वखर्चातून २९ हजार ६०० रुपयांची दुर्बीन बुधवारी खरेदी केली आहे.

गुणवत्ता वाढीसाठी साहित्य खरेदी

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १६७ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यावर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांना निधी वितरित करण्यात आला आहे. मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष यांच्या संयुक्त असलेल्या बँक खात्यावर शाळानुरूप पाच हजार ते ७५ हजार रुपये निधी वर्ग झाला आहे. संबंधित निधीचा योग्य विनियोग करण्याच्या सूचना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. या निधीचा स्वच्छतागृह, बोलक्या भिंती, डिजिटल शिकवणी साहित्य, चांगल्या दर्जाची दुर्बीण, एलईडी, संगणक यासोबतच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी आवश्यकतेनुसार साहित्य खरेदीसाठी वापर केल्या जाणार आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कमी निधीची तरतूद

 या वर्षी तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील दुर्बीण खरेदीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने सुरू केला आहे. ज्या शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत कमी निधीची तरतूद आहे. त्यांनी किमान दोन हजार रुपये किमतीची; तर जास्त निधी असणाऱ्या शाळांनी २० हजार रुपयांपर्यंत दुर्बीन खरेदी करण्याची परवानगी आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने आणण्यासाठी चळवळ सुरू झाली आहे.

१८ शाळांचा समावेश 

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आकाशातील चंद्र, तारे, ग्रह पाहण्याचे व त्याबद्दल अधिक ज्ञान ग्रहण करण्याची विशेष आकर्षण असते. त्यामुळे आता विद्यार्थी दुर्बिणीद्वारे ते पाहून त्याचे सविस्तर ज्ञान घेणार आहेत. सेनगाव येथील केंद्रीय प्राथमिक केंद्राअंतर्गत सेनगाव, लींगदरी, बरडा, जाम आंध, जामआंध तांडा, पवार तांडा, मकोडी, भानखेडा, भानखेडा तांडा, वरुड चक्रपान, कोळसा, सूर्यनगर वस्ती शाळा, सुकळी बुद्रुक, सुकळी खुर्द, सापटगाव, सिंगी नागा, कारेगाव अशा १८ शाळांचा समावेश आहे. 

सर्वत्र होतेय कौतुक 

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून चांगल्या प्रतीची दुर्बीण आणणे शक्य नसल्याने या निधीचा शाळा गुणवत्ता वाढीसाठी वापर करण्याचा शिक्षकांनी निर्णय घेतला आहे. जवळपास ७० शिक्षकांनी स्वतः निधी जमवून स्वखर्चातून २९ हजार ६०० रुपये किमंतीची दुर्बीण खरेदी केली आहे. प्रत्येक शाळेने चार दिवस दुर्बीणीचा उपयोग करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. शिक्षकांनी स्वखर्चातून खरेदी केलेल्या दुर्बीणचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिक्षकांना दुर्बीणीचे प्रशिक्षण

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला प्राप्त झालेल्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत निधीतून विद्यार्थ्यांसाठी दुर्बीण खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. तालुक्‍यातील १८ शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांसाठी दुर्बीण आणली आहे. यामुळे आकाशातील चंद्र, तारे व ग्रह पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तीन शिक्षकांना दुर्बीणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-शेषराव आसोले, गटसमन्वयक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT