बीड : फोनच्या माध्यमातून ऑनलाइन गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत महिलेची तब्बल ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना परळीत घडली. परळीतील विद्या वैजीनाथ मुंडे या महिलेस ९००४८११२९१ या क्रमांकावरून फोन आला.
तुम्ही ऑनलाइन रक्कम गुंतवल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीचा फायदा करून देतो, असे संबंधितांनी त्यांना फोनवरून सांगितले. गुंतवणुकीसाठी भामट्याने टेलिग्राम लिंक पाठवून दिली. त्यांनी ३२ लाख ६९ हजार गुंतविले.
मात्र, त्याने सांगितलेल्या मुदतीत कुठलीच रक्कम त्यांना मिळाली नाही. त्यानंतर या भामट्याने आपला मोबाइलही बंद करून ठेवला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विद्या मुंडे यांनी बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.