file photo 
मराठवाडा

नांदेडकरांचे सहाय्यता निधीत ४१ लाखांचे योगदान

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेडकरांनी कोरोनाच्या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ४० लाख ८१ हजार १९४ रुपयाची मदत नांदेडकरांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले आहेत. त्याचप्रमाणे पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५३ हजार ५५१ रुपये एवढी मदत दिली आहे. असे एकूण ४१ लाख ३४ हजार ७४५ रुपयांचे योगदान नांदेडकरांनी दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली आहे. 

मदतनिधी देणाऱ्या व्यक्ती व संस्था 
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका 8 लाख १६ हजार ६६६ रुपये, रामदास होटकर ३३ हजार ८७७ रुपये, ओमकार कन्स्ट्रक्शन एक लाख ११ हजार रुपये, अध्यक्ष व सचिव सुखी सदस्य निधी गट, वसंतनगर नांदेड एक लाख रुपये, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे दहा हजार रुपये, सविता औसेकर जालना पाच हजार रुपये, डॉ. आदिती काब्दे  पाच हजार रुपये, डॉ. अजित व्यंकटेश काब्दे पाच हजार रुपये, सुरेश काब्दे ठाणे पाच हजार रुपये तसेच सुनील काब्दे, मंगला काब्दे, भानूदेव काब्दे नांदेड या तिघांनी प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये, नंदकिशोर उपरे, पाच हजार रुपये, राजेंद्र भागवत, (पुसद, जि. यवतमाळ) पाच हजार रुपये, डॉ. अनंत भोगावकर, शिवाजीनगर पाच हजार रुपये तसेच डॉ. पुष्पा कोकीळ, शिवाजीनगर पाच हजार रुपये, सविता कलेटवाड, आंबेकरनगर पाच हजार रुपये, मारुती देगलुरकर पाच हजार रुपये, आंबेकरनगरचे डॉ. गवई प्राचार्य, विज्ञान महाविद्यालय स्नेहनगर पाच हजार रुपये, डॉ. बालाजी कोंबाळकर पाच हजार रुपये.

शाळा, कॉलेजकडूनही मदत
पीपल्स कॉलेज तसेच लक्ष्मण शिंदे नागरिक कृती समिती सात हजार रुपये, ए. आर. इनामदार, पीपल्स महाविद्यालय पाच हजार रुपये, राजेंद्र शुक्ला, सिद्धी कॉलनी पाच हजार रुपये, डॉ. एम. पी. शिंदे, सह्याद्रीनगर, कॅनाल रोड २१ हजार शंभर रुपये, बालाजी टिमकीकर दोन हजार रुपये, माणिक नगर तरोडा बुद्रुक, आणि अशोक सिद्धेवाड पाच हजार रुपये, इंद्रप्रस्थनगर, गुरुदेव पुरुष बचतगट जवळगाव तालुका हिमायतनगर दहा हजार रुपये. अध्यक्ष व सचिव गुरुदेव पुरुष बचतगट जवळगाव (ता. हिमायतनगर) २३ हजार ५५१ रुपये सत्यगणपती देवस्थान, (ता. अर्धापुर) नांदेड द्वारा धर्मादाय उपायुक्त दोन लाख २५ हजार, अध्यक्ष कै. रामगोपाल को. इंडस्ट्रीज लिमिटेड नांदेड यांनी एक लाख, नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी एक लाख अशी नांदेड जिल्ह्यातून आजतागायत मुख्यमंत्री सहायता निधी दिले आहेत. अशी एकूण ४० लाख ८१ हजार १९४ रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा झाली आहे.

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत देणारे 
विवेक मोगडपल्ले, कैलासनगर, नांदेड ५१ हजार रुपये, अध्यक्ष व सचिव श्री गुरुदेव पुरुष बचत गट जवळगाव (ता. हिमायतनगर) दोन हजार ५५१ रुपये सहायता निधीस दिले आहेत. दोन्हीही सहायता निधीची रक्कम एकूण ४१ लाख ३४ हजार ७४५ रुपये जमा करण्यात आले आहेत. 

सढळ हाताने मदत जमा करावी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ज्यांना आपले योगदान द्यावयाची इच्छा असेल अशा उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था आणि नागरिकांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९’ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. या देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून शंभर टक्के सूट देण्यात येते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मदतीसाठी आवश्यक खाते क्रमांक व बॅंकेची माहिती
Chief Minister’s Relief Fund-COVID 19, Savings Bank Account number 39239591720, State Bank of India,Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023,Branch Code 00300, IFSC CODE- SBIN0000300 . 
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720,स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023,शाखा कोड 00300,आयएफएससी कोड SBIN0000300

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT