karjmukti 
मराठवाडा

५३ हजार शेतकरी कर्जमुक्त

राजेश दारव्हेकर

हिंगोली : महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेत आतापर्यंत ८९ हजार १७७ खाते अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी ५३ हजार ३०५ शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात ३६३.९१ कोटी रुपयांची रक्‍कम जमा झाल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.

महात्‍मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेत आतापर्यंत ८९ हजार १७७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्याचा तपशील शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्‍यापैकी ७२ हजार ३०५ विशिष्ट क्रमांकासह असलेली कर्जखाती आहेत. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्यात ५९ हजार २८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण शिल्‍लक असलेल्या खात्यात १२ हजार ९७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तक्रार असलेल्या खात्यात एक हजार १२५ शेतकरी आहेत. डीएलसीद्वारे तक्रार निवारण झालेल्या खात्यात ६४ शेतकरी आहेत. 

३६३.९१ कोटी रक्‍कम शेतकऱ्यांना वितरीत

डीएलसीकडे तक्रार निवारणासाठी प्रलंबित असलेल्या खात्यात ४८९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तक्रार निवार झालेल्या खात्यात ३२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित तहसील कार्यालयाकडे तक्रार निवारणासाठी प्रलंबित असलेल्या खात्यात २४८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर लाभ रक्‍कम वितरीत झालेल्या खात्यात ५३ हजार ३०५ शेतकऱ्यांचा समावेश असून ३६३.९१ कोटी रक्‍कम लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची रक्‍कम लवकर जमा केली जाणार आहे. जिल्‍ह्यात तिसरी यादीदेखील त्‍वरित जाहीर केली जाणार आहे. 

यादी गावपातळीवर प्रसिद्ध होईल

ही यादी गावपातळीवर प्रसिद्ध होईल. शेतकऱ्यांची आधार पडताळणी करून पुढील कार्यवाही पूर्ण करून रक्‍कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण काही तांत्रिक बाबीमुळे होत नाही, अशा शेतकऱ्याचे ऑनलाइन संगणकीय आज्ञावलीद्वारे तक्रार थेट तहसील कार्यालयाकडे केली जाते. संबंधित शेतकरी स्‍वतः तहसील कार्यालयात उपस्‍थित होऊन तक्रार पावती, खाते पासबुक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्राची पडताळणी करून काम पूर्ण केले जाते. 

अद्यावत करण्याचे कामकाज बँक स्‍तरावर 

ज्‍या शेतकऱ्यांना कर्ज रक्‍कम आधार क्रमांकात बदल व इतर बाबीची माहिती जुळत नाही, अशा शेतकऱ्यांची ऑनलाइन अज्ञावलीमार्फत थेट जिल्‍हास्‍तरीय समितीकडे तक्रार वर्ग केली जाते. त्‍याचा निपटारादेखील बँकेकडून करून घेतला जातो. सुधारीत तपशील अद्यावत करण्याचे कामकाज बँक स्‍तरावर होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या या बाबत तक्रारी येत आहेत. कर्ज रक्‍कम पूर्ण जमा होत नाही, ज्या शेतकऱ्याचे खाते एनपीएममध्ये आहे, अशा शेतकऱ्यांना पंधरा टक्‍के रक्‍कम बँकानी माफ करावयाची आहे.

माहिती खातरजमा करून घ्यावी

 उर्वरित ८५ टक्‍के रक्‍कम शासनाकडून त्‍यांच्या बॅंकखाती जमा करण्यात आली आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. दरम्‍यान, आधार पडताळणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेकडून अपलोड केलेली माहिती योग्य आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावी, असे श्री. मैत्रेवार यांनी सांगितले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT