परभणी : परभणी येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने प्रस्तावित केलेला टंचाई कृती आराखडा जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात २७ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांचा आपेक्षित खर्च ग्राह्य धरला आहे. टंचाई कायमची घालवण्यासाठी जिल्ह्यात ४८१ गावे आणि ७६ वाड्यांत ५५७ सार्वजनिक विहिरी होणार आहेत.
परभणी जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई सुरू होते. नागरिकांना राणोमाळ पाण्यासाठी भटकंती करावी लागते.त्यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असतात. त्यासाठी जानेवारी महिन्याच्या सुरवातीला प्रस्तावित आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी पाठविला जातो. त्यानुसार जिल्हा परिषदेने जूनपर्यंतचा तयार केलेल्या आराखड्यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामध्ये २९७ गावे आणि ५३ वाड्यांत नवीन विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित आहे.
हेही वाचा - आजीसह चार बालके ‘साईआश्रया’त
२७ कोटी ३५ लाख ९५ हजार खर्च अपेक्षित
त्यासाठी दोन कोटी २७ लाख रुपये, १७५ गावे २६ वाड्यांत अशा २०३ विशेष नळ योजना दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्च पाच कोटी ९९ लाख ५० हजार, तापुरत्या पूरक नळ योजनामध्ये ४८१ गावे व ७६ वाड्यांचा समावेश असून ५५७ योजना आहे. त्यासाठी अपेक्षित खर्च १६ कोटी ५८ लाख ५५ हजार रुपये, ५५ गावे, १४ वाड्या यांच्यासाठी ६९ टॅंकर अपेक्षित असून खर्च दोन कोटी सात लाख रुपये अपेक्षित आहे. खासगी विहीर अधिग्रहणमध्ये ५७ गावे, १५ वाड्यांसाठी ७५ विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत. त्यासाठी ४० लाख ५२ हजार रुपये, बुडक्या घेणे या योजनेत एका ठिकाणी काम केले जाणार आहे. त्यासाठी दोन लाख पाच हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. असा एकूण २७ कोटी ३५ लाख ९५ हजार खर्च अपेक्षित आहे.
हेही वाचा व पहा - Video and Photos : ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव
गतवर्षी होती भीषण टंचाई
२०१८ मध्ये पाऊस पडला नसल्याने २०१९ च्या उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे जून २०१९ अखेर ३८२ गावांत ४७५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. तसेच ७४ गावे व २२ वाड्यांत ९९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पाणीपातळी वाढली आहे. यंदा मात्र, सुरवातीच्या तीन महिन्यांत कमी पाऊस झाल्याने २०२० मधील उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती होती. परंतु, सलग २२ दिवस झालेल्या पावसामुळे टंचाईची भीती कमी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.