623 dangerous buildings in Jalna city municipal corporation action notice to owners Sakal
मराठवाडा

Jalna News : जालना शहरात ६२३ धोकादायक इमारती; दुर्घटना झाल्यावर महापालिकेकडून कारवाई होणार का?

महापालिकेने आतापर्यंतच्या इतिहासात एकही धोकादायक इमारत न पाडल्याने दरवर्षी यात भर पडत आहे.

उमेश वाघमारे

Jalna News : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र, महापालिकेडून सर्वेक्षण करून धोकादायक इमारत मालकांना नोटिसा देऊन पुढे काहीच होत नाही. आजघडीला शहरात महापालिकेच्या रेकॉर्डनुसार तब्बल ६२३ धोकादायक इमारती आहेत.

मात्र, महापालिकेने आतापर्यंतच्या इतिहासात एकही धोकादायक इमारत न पाडल्याने दरवर्षी यात भर पडत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यानंतर धोकादायक इमारती जमीनदोस्त होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.  

जालना शहर स्टील, सीड्स आणि व्यापारी शहर आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्येत आणि घरांच्या संख्येत भर पडत आहे. मात्र, दुसरीकडे शहरात धोकादायक इमारतींच्या संख्येत भर पडत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावर दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न उद्भवतो.

महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून इमारत मालकांना नोटिसा दिल्या जातात. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण आजघडीला शहरात तब्बल ६२३ धोकादायक इमारती उभ्या आहेत.

त्यात महापालिकेकडून अकरा स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून पुन्हा धोकादायक इमारतींचे पुनःसर्वेक्षण सुरू केले आहे. नोटिसा दिल्यानंतर धोकादायक इमारती जमीनदोस्त होत नसल्याने मोठी दुर्घटना झाल्याशिवाय महापालिका कारवाई करणार नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.  

इमारत पाडण्याची जबाबदारी कोणाची?

महापालिकेकडून धोकादायक इमारत घोषित केली जाते. मात्र, ती इमारत पाडण्याची जबाबदारी ही इमारत मालकांची असल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो. इमारत जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेला मोठा खर्च येतो.

यासाठी इमारत पाडताना बांधकाम अभियंत्याचा अभिप्राय घेऊन प्रस्तावाला मंजुरी देणे. शिवाय इतर परवाने मिळवून स्थापत्य अभियंते, विध्वंस विशेषज्ञ, सुरक्षा निरीक्षक यांची टीम तयार करावी लागते.  बुलडोझर, क्रेन, हायड्रोलिक, ब्रेकर आदी यंत्रणांची गरज असते. या बाबी खर्चिक असल्याने महापालिका धोकादायक इमारत पाडण्यासाठी पुढाकार घेत नाही.

शहरात ६२३ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी काही इमारत मालकांनी दुरुस्ती करून घेतली आहे. तर, काही धोकादायक इमारती पाडून त्या नव्याने बांधल्या आहेत. त्यामुळे या ६२३ ठिकाणांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर धोकादायक शिल्लक इमारतींची संख्या स्पष्ट होईल. महापालिकेने धोकादायक इमारत घोषित केल्यानंतर ती संबंधित मालकाने पाडली पाहिजे. महापालिकेसाठी इमारत पाडणे ही खर्चिक बाब आहे.

— संतोष खांडेकर, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Latest Marathi News Updates : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी काँग्रेसची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक

IND vs AUS 1st Test: टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानला धक्का; Jasprit Bumrah ने मोडला कपिल देव यांचा विक्रम, ७ मोठे पराक्रम

Eknath Shinde: शिवसेनेच्या प्रकाश सुर्वेंची मागाठाणेत हॅट्‌ट्रिक, जाणून घ्या विजयाची इनसाइड स्टोरी

Sangli Election Results : पालकमंत्र्याची माळ कोणाच्या गळ्यात? खाडे, गाडगीळ, पडळकर, बाबर यापैकी एकाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT