Latur Water Storage Sakal
मराठवाडा

Latur Dam Water level : लातूर जिल्ह्यात १४४ प्रकल्पांत ७.६६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यात या पावसाळ्यात अपेक्षित सरासरीच्या १४५ टक्के पाऊस झाला आहे. प्रशासनाची तशी आकडेवारीही आहे. पण, जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या १४४ प्रकल्पांत सध्या ७.६६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे.

तीन मध्यम प्रकल्पांत तर उपयुक्त पाणीसाठा नाही. मांजरा प्रकल्पातदेखील केवळ चार सेंटीमीटरने पाणीसाठा वाढला आहे. मृतसाठ्यातूनच शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पात पाणी येण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

तीन प्रकल्पांत मृतसाठाच

जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत, यापैकी तावरजा, व्हटी, तिरू या तीन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. मृतसाठ्यातच पाणी आहे. या आठ मध्यम प्रकल्पांचा एकूण पाणीसाठा २८.१४८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. यात १४.९६४ मृतसाठा, तर १३.१८४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. याची टक्केवारी १०.७९ इतकी आहे.

निम्न तेरणात आला उपयुक्त साठा

जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणात ४४.०६८ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. दोन दिवसांत केवळ चार सेंटीमीटरने पाण्यात वाढ झाली आहे. निम्न तेरणा प्रकल्पात एकूण ४४.१२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. यात उपयुक्त पाणीसाठा १४.१६१, तर मृतसाठा २९.९६७ दशलक्ष घनमीटर इतका आहे.

सध्या १३४ प्रकल्पांत ८.४७ टक्के पाणी

जिल्ह्यात १३४ लघू प्रकल्प आहेत. याची साठवण क्षमता ५१.५१३ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पात २६.६१२ उपयुक्त पाणीसाठा असून, याची टक्केवारी ८.४७ इतकी आहे. अनेक प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. प्रकल्पात पाणी येण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

मोठ्या पावसाची गरज

जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित असलेल्या पावसापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त असा आहे. पण, प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यासाठी मात्र मोठ्या पावसाची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT