फोटो 
मराठवाडा

लष्करातील जवान जात होता सासुरवाडीला... पत्नीच्या भेटीपूर्वीच...

विनोद आपटे

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : खतगाव (ता. मुखेड) येथील सुटीवर आलेल्या संभाजी शिवाजी पानगटवार या सैनिकाचा सासुरवाडीला जाताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नीला भेटण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. ही घटना व्हॅलेंटाईनडे (ता. १४) रोजी घडली. 

आंनदवाडी (ता. देवणी) जि. लातुर येथे असलेल्या सासरवाडीत पत्नीची भेट घेण्यासाठी नुकताच सुटीवर आलेला जवान शुक्रवार (ता. १४) रोजी दुपारी एक वाजता जात होता. परंतु रस्त्यात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तश्राव झाला. परंतु घटना घडल्यानंतर लगेच काही नागरिकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाकल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.

या सैनिकाचा ता. २८ एप्रिल २०१९ रोजी म्हणजे नऊ महीण्यापुर्वी विवाह झाला होता. ते कोलकता येथील आर्मीमध्ये गनर या पदावर कार्यरत होते. या घटनेमुळे खतगाव व मुक्रमाबाद  परीसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचाशेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका- हभप ढोक महाराज​
पत्नीची भेट घेण्यापूर्वीच काळाचा घाला 

दोन दिवसापुर्वी ता. १० फेब्रुवारी २०२० ते सात मार्चपर्यत २७ दिवस सुटिवर आलेला भारतीय  सैन्यातील सैनिक संभाजी शिवाजी पानगटवार हा ता. १  सकाळी १० वाजता आपली मोटारसायकल   (MH 14 FV0220) वरुन सासरवाडी आंनदवाडी ता. देवणी येथे जात असताना दुपारी एक वाजता   पांगरा फाटा येथे  देवणी आंनदवाडी रोडवर क्रुझर जीप (MH12 YA 8610) सोबत अपघात झाला. आठ महीण्यापुर्वी विवाह झालेल्या या सैनिकाच्या नवविवाहीतेवर मात्र वैधव्य आले.

शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

त्यांच्या पश्चात पत्नी ऐश्वर्या, आई -वडील, एक भाऊ असा परीवार आहे. त्यांच्या पार्थीवावर मुखेडचे तहसीलदार काशीनाथ पाटील, मुक्रमाबाद ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गडीमे,  जिल्हा सैनिक कार्यालयाचे संघटक कमलाकर शेटे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी नांदेड पोलीस दलातर्फे मुक्रमाबाद पोलीसानी मानवंदना दिली. शनिवारी (ता. १५) रात्री उशिरा त्याच्या पार्थीवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT