accident in Jalna jeep falls into well while trying to save bike 7 killed 7 injured Sakal
मराठवाडा

Jalna Accident : जालना-राजूर मार्गावर जीप विहिरीत पडून सात वारकऱ्यांचा मृत्यू; सात जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalna News : जीप (काळी-पिवळी) विहिरीत कोसळून सात जण ठार तर, सात जण जखमी झाल्याची घटना जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडी शिवारात गुरुवारी (ता. १८) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पंढरपूरहून परतलेल्या पाच जणांचा मृतांत समावेश आहे.

चणेगाव (ता. बदनापूर) येथील नऊ वारकरी पंढरपूरला पायी गेले होते. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन गुरूवारी ते बसने जालन्यात दाखल झाले. जालना येथून गावी जाण्यासाठी काळीपिवळीतून ते राजूरकडे निघाले होते. तुपेवाडी शिवारात समोरून आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले.

त्यामुळे रस्त्यापासून ५० ते ६० फुटांवर असलेल्या विहिरीत काळीपिवळी कोसळली. या अपघातात ताराबाई मालुसरे (वय ५५),  चंद्रकला घुगे (वय ५०), प्रल्हाद महाजन (वय ६०), प्रल्हाद बिटले (वय ७५), नारायण निहाळ (वय ४५), मंदा तायडे (वय ६५), आणि रंजना कांबळे (वय ४५) यांचा मृत्यू झाला.

विहीरीत कोसळलेली काळीपिवळी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. बचाव कार्यासाठी जालन्यातील अग्निशमन दल दाखल झाले होते. विहिरीतील पाण्याचा उपसा करून जीपमधील प्रवाशांचा शोध घ्यावा लागला. जीपचालक बाबासाहेब हिवाळे यानेही अपघातानंतर दोन ते तीन जणांना बाहेर काढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT