liquor shops in Pachod esakal
मराठवाडा

Pachod : धुळे-सोलापूर महामार्गावरील दारू दुकानांवर दारुबंदी विभागाने फिरविला JCB; सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पाचोड येथे अवैध दारूसह जुगार, वाळु तस्करी, अवैध गौणखनिज आदी अवैध धंद्यांनी कळस गाठला होता.

हबीबखान पठाण

धुळे - सोलापूर महामार्ग, पाचोड - पैठण रस्ता व बाजार मैदानातील जवळपास दहा ते बारा अवैध दुकानांत साठविलेल्या दारूच्या हजारो बॉटल्ससह सदरील दुकानांवर जेसीबी फिरविला.

पाचोड : गेल्या अनेक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या अवैध दारूंच्या दुकानांवर प्रथमच दारूबंदी विभागाने (Liquor Ban) कारवाईचा बडगा उगारून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासह (Dhule-Solapur National Highway) बाजार मैदानातील दुकानांवर जेसीबी फिरवून दुकानांसह अवैध दारूचे साठे नष्ट केल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) सायंकाळी पाचोड (ता. पैठण) येथे घडली.

यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड येथे अवैध दारूसह जुगार, वाळु तस्करी, अवैध गौणखनिज आदी अवैध धंद्यांनी कळस गाठला होता. येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी कुणीच धजावत नसल्याने अवैध धंदे चालकांचे मनोबल वाढून त्यांची पोलिसांची कॉलर पकडण्या इतपत मजल गेली होती. यासंबंधी काही सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी दारूबंदी विभागाकडे तक्रार करून कार्यवाहीची मागणी केली होती.

दारूबंदी उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे व राज्य उत्पादन शुल्क उपअधिक्षक गुनाजी क्षीरसागर यांनी मंगळवारी (ता. दोन) आपल्या पथकासह पाचोड गाठून सर्वप्रथम दुकानांची गोपनिय माहिती घेतली व धुळे - सोलापूर महामार्ग, पाचोड - पैठण रस्ता व बाजार मैदानातील जवळपास दहा ते बारा अवैध दुकानांत साठविलेल्या दारूच्या हजारो बॉटल्ससह सदरील दुकानांवर जेसीबी फिरविला. यांत लाखो रुपयाच्या दारूचा चुराडा करण्यात आला. तर, अवैध दारू विक्रीसाठी उभारलेल्या पत्र्याच्या दुकानांना जेसीबीने भुईसपाट करण्यात आले.

liquor shops in Pachod

स्वातंत्र्य काळापासून प्रथमच अवैध धंद्यांविरूद्ध एवढी मोठी "कोम्बो" कारवाई झाली. अवैध दारू विक्रीविरुद्ध पोलिस कारवाई करीत असल्याचे पाहून घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. दारूबंदी विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्यासह महावितरण व महसूल कर्मचारी आदींना सोबत घेऊन ही कारवाई केली. यांत पत्र्याची दुकानं, फ्रिज, ड्रम , खुर्च्या अन्य साहित्याचा जेसीबीने चुराडा करण्यात आला.

राजू एकनाथ शेंडगे, गोविंद कडुबा गवारे, आकाश शिवाजी म्हस्के, सोनू अंकुश म्हस्के, शिवाजी मारुती डुकळे, अप्पासाहेब नारायण शेळके, राम कचरु भालसिंगे सर्व रा. पाचोड (ता. पैठण) यांच्यावर अवैध दारु अड्डे चालविल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे.

या संयुक्त कारवाईत निरीक्षक एस. ए. शिंदे,अशोक साळोखे, राहुल गुरव, आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक एस. के. वाघमारे, पूनम चव्हाण, श्रीमती राठोड, ए. ई. तातळे, सुभाष गुंजाळे, राहुल बनकर, योगेश घुनावत, हर्षल बारी, विनायक चव्हाण, श्री. मुपडे, सुनिल दामदर, चेतन वानखडे, ज्ञानेश्वर सांभारे, सचिन पवार, अशपाक शेख, शारीक कादरी, किशोर सुंदडे यांच्यासह पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार गोविंद राऊत, जमादार आण्णासाहेब गव्हाणे, अभिजित सोनवणे, नागनाथ केंद्रे असे कारवाईत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT