file photo 
मराठवाडा

परभणीत जुगार अड्ड्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहरातील शालीमारनगरमधील एका मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी  (ता. १७) रात्री साडेनऊ वाजता नानलपेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एक लाख सात हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या ठिकाणावरून नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित नऊ जन पळून जाण्यात यशस्वी झाले.

परभणी शहरातील शालीमारनगर परिसरातील एका मोकळ्या जागेतील झाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती नानलपेठ पोलिसांना मिळाली. यावरून सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व पोलिस निरीक्षक कुंदन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार साईनाथ पुराड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाला मंगळवारी (ता. १७) रात्री साडेनऊ वाजता माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिस पथकाने शालीमारनगरमधील त्या झाडी असलेल्या परिसरात छापा मारला. या ठिकाणी काही आरोपी जुगार खेळत असल्याचे दिसून  आले. हा जुगार पैशावर सुरू होता. पोलिसांनी छापा मारताच काही आरोपींनी तेथून पळ काढला. परंतु, काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

एक लाख सात हजाराचा ऐवज जप्त 
त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व इतर वस्तू, असा एकूण एक लाख सात हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला. या ठिकाणाहून आरोपी शेख एकबाल शेख अजगर, रवी जानकीराम बचनर, इरशाद खान करीम खान, सादेक खान अन्वर खान, शेख आमेर शेख अखील, समीर खान सलीम खान, सिद्धिकी शेख मकसूद, शेख युनूस शेख इब्राहीम या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींसह इतर १९ जनांवर नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत नानलपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी श्री. गुंगाणे, श्री. राठोड, श्री. काळे, श्री. अन्सारी, श्री. शौकत, श्री. चव्हाण, प्रदीप रणशूर, श्री. सानप यांनी मिळून केली.

 नऊ आरोपी पळून जाण्यात यशस्वी
जुगार अड्ड्यावर छापा मारताच तेथे पळापळी झाली. त्यातील नऊ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT