सेलू (जि. परभणी) : ‘कोरोना’ विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशासह राज्यात शासनाने २१ दिवसांचा ‘लाॅकडाऊन’ सुरू केला असल्याने अनेकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या लाॅकडाऊनमध्ये राजस्थान, गुजरात, कर्नाटक राज्यातील उदरनिर्वाह करण्यासाठी भटकंती करणारे जवळपास ८० नागरिक देवला पुनर्वसन (ता. सेलू, जि. परभणी) या ठिकाणी अडकून पडले आहेत. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी पुढाकार घेत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
देवला पुनर्वसन (ता. सेलू, जि.परभणी) या ठिकाणी रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली होती. याची माहिती माजी नगराध्यक्ष पवन आडळर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांना कळाली. पवन आडळकर यांनी तत्काळ या मजुरांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्यक्ष देवला पुनर्वसन या ठिकाणी त्यांनी धाव घेतली व संबंधितांची चौकशी करून तत्काळ प्रत्येक कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा माल व जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडविले.
यांची होती उपस्थिती
या वेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देविदास एकबोटे, तहसीलदार बालाजी शेवाळे, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, नगर परिषदेचे गटनेते संदीप लहाने, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. संजय हारबडे, अविनाश शेरे, विनोद तरटे, पारस काला, सचिन राऊत, विलास पौळ, अशोक राऊत, मुकूंद आष्टीकर, श्याम साडेगावकर, रामा कदम, कलिम कादरी आदींची उपस्थिती होती.
जीवनावश्यक वस्तूंच्या किटमधील साहित्य....
दहा किलो गहू आटा, दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर, चहा पावडर, शेंगदाणे, लाल पावडर, हळदी, मसाला, तेल, मीठ, साबण, टूथपेस्ट, हॅंडवाॅश, फिनेल, बिस्किट पाकीट आदी वस्तूंचा समावेश आहे.
हेही वाचा - सावधान, नांदेड शहरात प्लॅस्टिकचा भस्मासुर वाढतोय
बांधिलकी जोपासली
सेलू (जि. परभणी) या शहराने मराठवाड्यात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून नावलौकिक प्राप्त केले आहे. ‘कोरोना’ विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या ‘लाॅकडाऊन’ मध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे यातून सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.