नांदेड - जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीनंतर बुधवारी (ता.पाच) अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी निवडीनंतर पहिल्याच बैठकीत शासन - प्रशासनामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीनंतर बुधवारी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपाध्यक्षा पद्मा नरसारेड्डी सतपलवार, समाजकल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशीला बेटमोगरेकर, सभापती संजय बेळगे, बाळासाहेब रावणगावकर, सदस्या पूनम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - धक्कादायक...! वेबसाईट डेटा चोरुन पैशाची मागणी
निवडी नंतर पहिलीच बैठक
पदाधिकारी निवडीनंतर आयोजित पहिल्या बैठकीत मागील सभा अहवालातील प्रलंबीत मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर विकास कामाविषयी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला खुलासे सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान निवड प्रक्रियेनंतर स्थायीच्या पहिल्याच बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, व्ही. आर. कोंडेकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या ठरावानंतर कामकाजला सुरवात झाली.
निम्यावर रिकाम्या खुर्च्या
स्थायी समितीच्या एकून अकरा सदस्यांपैकी चार सदस्यांची सभापतिपदी निवड झाल्याने बैठकीत समितीचे संख्याबळ घटले. त्यामुळे नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदस्यांच्या खुर्चीवर केवळ भाजप च्या पुनम पवार यांची उपस्थिती होती. मात्र, उर्वरित खुर्च्या रिकम्या दिसून आल्या.
येथे क्लिक करा - नकारात्मक विचार सोडा, हे करा...
मुद्दांचा अहवालात समावेश नाही
सदस्या पुनम पवार यांनी महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी शालेय विद्यार्थीनींसाठी ‘रागिनी’ नावाने हेल्पलाईन सुरु करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामसभा होत नसताना कागदोपत्री ग्रामसभा दाखवण्यात येत आहेत या वर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नाही. स्वच्छ भारत मिशन या लोकाभिमुख उपक्रमाचा सक्षम अंमलबजावणी अभावी बट्याबोळ झाला आहे. नुसते बोर्ड लावून पाणंदमुक्तीचा आव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, बैठकीतील उपस्थितीत केलेले मुद्द्यांचा सभेच्या इतिवृत्तामध्ये समावेश होत नसल्याची खंत सौ. पवार यांनी व्यक्त केली.
साहेब तुमचं नेहमीचच
स्थायी समितीच्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी एक तास उशीराने हजर झाल्याने अध्यक्ष सौ. अंबुलगेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साहेब, तुमचं नेहमीचच.. असा उपहासात्मक प्रतिसाद दिला. सभापती संजय बेळगे यांनी अध्यक्षा सौ. अंबुलगेकर यांची री ओढत प्रशासनावर सवाल उपस्थित केले. दरम्यान, नियोजित वेळेत बदल करुन एक तास अगोदर बैठक सुरु झाल्याचेही बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.