Shri Yedeshwari Devi Yatra  Sakal
मराठवाडा

Shri Yedeshwari Devi Yatra : श्री येडेश्वरी देवी चैत्र पौर्णिमा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

येथील प्रसिद्ध आराध्य दैवत असणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा २३ ते २८ एप्रिल दरम्यान होत असुन मुख्य चुनावेचण्याचा कार्यक्रम बुधवारी (ता.२४) रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी दर वर्षी बारा लाखाच्या वर भाविक दाखल होतात

दीपक बारकूल

येरमाळा : येथील प्रसिद्ध आराध्य दैवत असणाऱ्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा २३ ते २८ एप्रिल दरम्यान होत असुन मुख्य चुनावेचण्याचा कार्यक्रम बुधवारी (ता.२४) रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी दर वर्षी बारा लाखाच्या वर भाविक दाखल होतात.

त्याअनुषंगाने भाविकांची गैरसोय होऊ नये.कायदा सुवस्था,व भाविकांच्या सूरर्क्षेसाठी पोलिस प्रशासनाने पाहणी केली असून यात्रा काळात २३ ते २८ एप्रिल दरम्यान येरमाळ्यातून जाणाऱ्या जडवाहनांना बंदी करण्यात आली आहे.

अवजड वाहणांना बाह्यवळण वाहतूक व्यवस्था केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता १९) रोजी आदेश देऊन वाहतुकीतील बदल व यात्रा बस्थानक यात्राशेडचे नकाशे प्रकाशित केले आहेत.

चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी राज्यभरासह बाहेर राज्यातून लाखोंच्या वर येतात.यात्रेत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागावर ताण असतो यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध विभागांनी तयारी केली असुन जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

यात्रा काळात भाविकांच्या आरोग्यसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक तर आरोग्य केंद्रात एक आरोग्यबूथ तर वैद्यकीय अधिकारी १९,पर्यवेक्षक १०,आरोग्य सेवक २०,सेविका १०,परिचर १० अतिरिक्त कर्मचारी रुजू झाल्याचे डॉ.सचिन तेलप यांनी सांगितले.

महावितरण कडून यात्रेसाठी परिसरातील रोहित्र,विद्युत वाहिन्या,दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पर्यायी व्यवस्था येडशी येथुन उपलब्ध आहे.शिवाय ग्राम पंचायत मागणी नुसार यात्रेतील व्यावसायिकांना वीज पुरवठा आदी कामे करणार आहे असे शाखा अभियंता स्नेहा कोंगलावर यांनी सांगितले.

येडेश्र्वरी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी परिवहन विभागाकडून यात्रास्पेशल म्हणून धाराशिव, सोलापूर विभागाच्या २००,तर लातूर,बीडच्या विभागाच्या १५० बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात बीड विभागाचे यात्रा शेड बिजगुनन केद्राच्या बाजूला बीड रोडवर, लातूर, सोलापूर,

उस्मानाबाद विभागचे बीएसएनएल उपकेंद्रा जवळ तर बार्शी,करमाळा,परंडा आगाराच्या बसेससाठी मुंबई,पुणे,कोल्हापूर,पंढरपूर,कडे जाणाऱ्या भाविकांसाठी बार्शी रोडवरील महावितरण उपकेंद्राच्या शेजारी करण्यात आल्याचे.वाहतूक नियंत्रक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाचे सापोनि महेश क्षिरसागर यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी १,सापोनी,पोनि ४५,पुरुष पोलिस ३५०,महिला १५०,होमगार्ड ३००,महिला होमगार्ड १५० असा पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.यात्रे दरम्यान लोकसभा निवडणुका असल्याने बंदोबस्त किती मिळेल ते रविवारी (ता.२१)रोजी समजेल असे सांगितले.

मंदिर ट्रस्टने शुद्ध (आर. ओ.)पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून भाविकांना दर्शन रांगेत पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.मंदिर परिसर,सभामंडप,या ठिकाणी ६५ तर आमराई परिसरात २० सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय तसेच मंदिर परिसरात पोलिसांच्या जोडीला खाजगी ६० सुरक्षा रक्षक तुकडी नेमल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

तर ग्रामपंचायतने ३० टँकर,लातूर येथील भाविक खैरमोडे यांचे १०, बार्शी येथील माजी आमदार यांच्या वतीने २० अशा ६० टँकरची सोय तर यात्रा काळात सुरक्षेसाठी दोन अग्निशामक बंबाची व्यवस्था केल्याचे सरपंच मंदाकिनी बारकुल यांनी सांगितले.

चुना वेचण्याचा कार्यक्रम पालखीचे अमराई मंदिराकडे प्रयाण हे कार्यक्रम पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतात. श्री येडेश्वरी देवीची बारमाहीची पौर्णिमा दुसरीच साजरी केली जाते.मात्र दर वर्षी पहिल्या पौर्णिमेला चुनावेचण्यासाठी भाविक मोठया प्रमाणात दाखल होतात.

त्यामुळे भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी होते.यावर्षी दुष्काळी स्थिती असली तरी रब्बी हंगामातील सुगी उरकली आहे,पीकं समाधान कारक झाल्याने आणि शाळेला उन्हाळी सुट्ट्या झाल्याने यात्रा मोठया प्रमाणात भरेल असे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT