file photo 
मराठवाडा

नांदेडच्या ‘कंटेंटमेंट झोन’वर प्रशासनाचे लक्ष...

अभय कुळकजाईकर

नांदेड - पिरबुऱ्हाणनगरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन दक्ष झाले असून ‘कंटेंटमेंट झोन’वर विशेष लक्ष देऊन आहे. शुक्रवारी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्तींना क्वारंनटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या परिवारातील आठ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.  

पिरबुऱ्हाणनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. या झोनमध्ये शुक्रवारी (ता. २४) महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे तीन हजार ८९२ घरांमधील १६ हजार ८५५ व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर कोरोनाबाधित व्यक्तीच्या परिवारातील आठ सदस्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचबरोबर चार व्यक्तींना एनआरआय यात्री निवास येथे क्वारंनटाइन करण्यात आले आहे.

झोनमधील नागरिकांची थर्मल मशीनने तपासणी
नांदेड महापालिका हद्दीत पीरबुऱ्हाणनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे पीरबुऱ्हाणनगरसह सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर, इंदिरानगरसह आजूबाजूचा परिसर हा कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर या झोनमधील नागरिकांची थर्मल मशीनद्वारे ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आहेत का, याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य पथकाद्वारे तपासणी 
जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, महापालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू आणि महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पर्यवेक्षक, आशा वर्कर, परिचारिका यांनी या झोनमध्ये तपासणी सुरू केली आहे.

९८ नमुने तपासणी अहवालाची प्रतीक्षा
जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोरोना संसर्गाबाबतची माहिती देण्यात आली आहे.

  • - एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ः एक
  • - आतापर्यंत एकूण क्वारंटाइन ः ७९९
  • - क्वारंटाइन कालावधी पूर्ण ः २६८
  • - अजून निरीक्षणाखाली असलेले ः १०२
  • - त्यापैकी दवाखान्यात क्वारंटाइनमध्ये ः ३८
  • - घरीच क्वारंटाइनमध्ये असलेले ः ७६१
  • - शुक्रवारी तपासणीसाठी नमुने घेतले ः ४४
  • - एकूण नमुने तपासणी ः ६००
  • - त्यापैकी निगेटिव्ह ः ४९६
  • - नमुने तपासणी अहवाल बाकी ः ९८
  • - नाकारण्यात आलेले नमुने ः पाच
  • - जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवाशी ७९ हजार ८४२ असून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

घरातच राहण्याचे आवाहन
कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी लॉकडाउनचे पालन करावे. घराच्या बाहेर पडू नये. घरातच रहावे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. वारंवार हात स्वच्छ धुवावे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा.
- डॉ. सुनिल लहाने, आयुक्त, नांदेड महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : अभिनेते, आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी सोलापुरात 'रोड शो'; नागरिकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT