केंद्रा बुद्रुक ः सेनगाव तालुक्यातील केंद्राबुद्रुकसह जामठी बुद्रुक, गोंधनखेडा, मन्नास पिंपरी, ताकतोडा, केंद्रा खुर्द ही गावे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दत्तक घेतली असून या गावांत शासनाच्या विविध विकास योजना सुरू असल्याने गावे ‘कात’ टाकणार आहेत.
केंद्रा बुद्रुक येथील भूमिपुत्र असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नोव्हेंबर महिन्यात (ता.१९) गावांत भेटी देत ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. गावांत शासनाच्या विकास योजना राबविण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली व केंद्रा बुद्रुकसह जामठी बुद्रुक, गोंधनखेडा, मन्नास पिंपरी, ताकतोडा, केंद्रा खुर्द ही गावे दत्तक घेतली. या गावांत पुणे येथील बाएफ ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून विकासकामे सुरू झाली आहेत. या गावांत डॉ.अविनाश भिडे, संदीप चौधरी, सुनित वाती, संदीन निगहुंत, नहरिका सिंग, मधुरा चौधरी यांच्या पथकाने नुकतीच भेट दिली.
एचडीएफसी बँकेचा निधी दत्तक गावांच्या विकासासाठी
औद्योगिक संस्था, बँक क्षेत्रातील मिळणाऱ्या मिळकतीचा दोन टक्के भाग कुठल्याही राज्यातील विकासकामांवर खर्च करावा लागतो. यातून एचडीएफसी बँकेच्या मिळकितीच्या दोन टक्के भागातून या पाचही दत्तक गावांचा विकास केला जाणार असल्याचे या संस्थेतर्फे सांगण्यात आले. नंतर या संस्थेने गावात कोणते विकास कामे करता येतील याचे सर्वेक्षण केले. यात शेती विकास, महिला सक्षमीकरण गावातील मूलभूत विकासकामांवर भर दिला जात आहे. बाएफच्या एका तज्ज्ञ पथकाने भेटी देत संपूर्ण शेतशिवार फिरून कुठे पाणी अडवून अथवा तळ्यायोग्य जागेचा शोध घेवून त्याचा शेतीसाठी उपयोग कसा होईल याची पाहणी केली.
शासनाच्या विविध योजना घेतल्या जाणार
गावातील शेती समृध्द झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ते सक्षम होतील यासाठी शासनाच्या विविध योजना घेतल्या जाणार आहेत. यात पाणलोटाची देखील कामे केली जाणार असून सिंचनक्षेत्र वाढविले जाणार आहे. यामुळे येथे जिल्ह्याची शासकीय यंत्रणा लगेच कामाला लागली आहे. पाचही ग्रामपंचायतला गाव शेतशिवार कामाचे कृती आराखडे तयार करण्याच्या सूचना देऊन संबंधित ग्रामसेवक व पधाधिकाऱ्यांकडून कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत.
हेही वाचा - शिवशाही बस ट्रकवर आदळळी, सहाजण जखमी
बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत
रोजगार हमीतून विहिरीच्या कामांना चालना देण्यात आली आहे. स्वच्छता मोहिमेच्या कामावर भर दिला जात आहे. या संदर्भात नुकतीच अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी भेट देऊन या गावांतील विकासकामांचा आढावा घेतला. या गावांतील ग्रामस्थ व नवयुवकांतून शेतीसंलग्न शासकीय दूध डेअरी प्रकल्प, शेळी पालन व दुग्ध व्यवसायला चालना देण्यात येणार असल्याने या गावातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
गावाचा कृती आराखडा तयार केला
महिला सक्षम होण्यासाठी बचतगट चळवळ सुरू करून बचतगटाला बचतीची सवय लागावी यासाठी त्यांना त्याचे महत्त्व पटवून गटांना बँकेमार्फत व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत गावाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा - नांदेडला पाणीपट्टीकराचा गोंधळ सुरूच
अशी आहेत गावनिहाय कामे
केंद्रा बुद्रुक येथे पंधरा फूट विहिरीचे काम करण्यात आले आहे. सध्या विहिरीत पाणी जमा झाल्याने काम बंद आहे. मन्नास पिंपरी येथे चाळीस फूट विहिरीचे काम करण्यात आले आहे. केंद्रा खुर्द येथे आठफुटाचे काम सुरू आहे. इतरही गावात देखील विहिरीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांनी एमआरईजीएसतंर्गत बांधावरील वृक्ष लागवड सुरू केली आहे. यात ताकतोडा येथे १२ शेतकऱ्यांच्या बांधावर काम सुरू आहे. केंद्रा बुद्रुक येथे प्रस्ताव आले असून ते देखील काम लवकरच सुरू होत आहे. मन्नासपिंपरी येथे एक हेक्टरवर वृक्षलागवडीचे काम सुरू असल्याचे सांगितले.
संस्थेने विकास कामासंदर्भात सर्वेक्षण केले
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दत्तक घेतलेल्या आमच्या गावासह इतर गावांत नुकतेच एका संस्थेने विकास कामासंदर्भात सर्वेक्षण केले असून गावात विकासकामे सुरू झाली आहेत. यामुळे ग्रामस्थांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार असल्याने गावकऱ्यांतून समाधान मानले जात आहे. - प्रमोद सावके, सरपंच, ताकतोडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.