Aadul Lake Work sakal
मराठवाडा

Adul News : पायाभरणी नंतर डागडुजी केलीच गेली नसल्याने, पैठण तालुक्यातील अनेक तलावांची हिच स्थिती

गेवराई मर्दानंतर आडुळच्या तलावाची भिंत साळ नावाच्या प्राण्याने भित पोखरल्याने फुटला तलाव.

सकाळ वृत्तसेवा

आडुळ - मागील महिन्यात गेवराई मर्दा येथील पाझर तलाव फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया तर गेले होते. माञ, त्याखाली अलेल्या शैकडो हेक्टर वरिल पिके पाण्यात वाहुन गेली होती. हि घटना ताजी असतांनाच ज्या प्रकारे गेवराईचे तलाव साळ नावाच्या प्राण्याने पोखरल्याने फुटली होती.

अगदी त्याच पध्दतीने सोमवारी (ता.१४) रोजी आडुळ, ता. पैठण येथील शंभर टक्के तुडुंब भरलेल्या पाझर तलावाची भिंत साळ नावाच्या प्राण्याने पोखरल्याने यातील लाखो लिटर पाणी तर वाया गेले. शिवाय अनेक शेतकरी, दुकानदार व नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले होते.

घटनेची माहिती मिळताच माजी अर्थ व बांधकाम सभापती यांनी घटनास्थळी धाव घेवुन संबधित विभागाला फुटलेली भिंत तात्काळ दुरुस्त करा अशा सुचना दिल्या होत्या. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने राञी उशिरापर्यंत भिंत बुझविण्याचे काम सुरु होते. राञी परत पाऊस सुरु झाल्याने कामात अडथळा निर्माण झाला यानंतर पुन्हा मंगळवारी (ता.१५) रोजी पोकलॅन्ड मशिनच्या सहाय्याने आजुबाजुच्या मातीचा भराव टाकुन बुझविण्यात आली.

सदरील नुकसानीचे पंचनामे मंगळवारी (ता.१५) रोजी मंडळ अधिकारी वैशाली कांबळे, तलाठी भरत सवणे यांनी केले. विशेष म्हणजे गावात येवढी मोठी घटना घडुन ही तालुका व जिल्हा स्तरावरील एक ही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. तुडुंब भरलेल्या तलावातील लाखो लिटर पाणी वाया गेल्याने आगामी काही दिवसातच आडुळ बु., आडुळ खुर्द, पिवळवाडी, आडुळ तांडा, जामवाडी येथील ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

सध्या तात्पुर्त्या स्वरुपात येथील ग्राम पंचायत मार्फत फुटलेली भिंत बुझविण्यात आली. यासाठी येथील ग्राम पंचायत सदस्य भाऊसाहेब पिवळ, नारायण पिवळ, सरपंच बबन भावले, उपसरपंच जाहेर शेख, ग्राम विकास अधिकारी सचिन डिघुळे, सुनिल पिवळ, गोपीनाथ बनकर, शितल कासलीवाल यांच्या सह येथल अनेक नागरीक तलावाच्या भिंतीची दुरुस्तीसाठी घटनास्थळी ठाण मांडुन होते.

तालुक्यातील अनेक तलावांना डागडुजीची गरज

पैठण तालुक्यात अनेक तलाव जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या अधिकारात येते. या तलावांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी हि संबधित विभागाची आहे माञ तालुक्यातील अनेक तलाव झाल्यानंतर त्याची कधीच डागडुजी करण्यात आली नाही वास्तविक पाहाता या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासना तर्फे लाखो रुपयांचा निधी मिळतो पण जेव्हा तलावांची दुरुस्तीच होत नाही तर हा निधी जातो कुठे असा प्रश्न आडुळ व गेवराई मर्दा येथे घडलेल्या घटनेमुळे नागरीक उपस्थित करीत आहे.

आम्ही काल रा़ञी उशारा पर्यंत व आज पुन्हा सकाळ पासुन भिंत बुझविण्याचे काम करीत होते. घटना स्थळी यंञ सामग्री नेण्यासाठी खुप अडचणी येत आहे तरी ही आम्ही कसोशिने पर्यत्न करुन तात्पुर्ती का होईन भिंतीची दुरुस्ती केले आहे माञ याला आणखीन दुरुस्तीची गरज असुन भविष्यात जास्त पाऊस झाल्यास भिंत कधी ही फुटु शकते.

- भाऊसाहेब पिवळ, ग्राम पंचायत सदस्य

सदरील पाझर तलाव हा साळ नावाच्या प्राण्याने तलावाची भिंत पोखरल्यामुळे फुटला असुन या ठिकाणी साळीचे अवशेष सापडले आहेत. तलाव फुटल्याने १००% टक्के भरलेल्या तलावातुन ५० % पाणी वाहुन गेले आहे. यात झालेल्या नुकसानीचे आम्ही पंचनामे केले आहेत.

- वैशाली कांबळे, मंडळ अधिकारी आडुळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

SCROLL FOR NEXT