कनेरगावनाका ः किरकोळ बाजारात फोडणीत नित्यनेमे लागणाऱ्या गोडेतेलाने शंभरी गाठली असून पुढील काळातदेखील यात भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जेवन रूचकर आणि मसालेदार करण्यासाठी फोडणीला वापरले जाणारे तेल आणि कांदा यांनी दरवाढीमुळे अनेकांच्या खिशाला कात्री लावली आहे.
दिवाळीनंतर तेलात दरवर्षी थोड्या अधिक प्रमाणात भाव वाढ होत असते. मात्र, ही वाढ जुजबी असते. या वेळी मात्र दिवाळीपासून एक किलो तेलात पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीला ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो असणारे तेल आता शंभर रुपयांवर विक्री होत आहे. एका महिणन्यातच एवढी मोठी वाढ प्रथमच झाली आहे.
पामतेल थिजत असल्याने सोयाबीन तेलाची मागणी
बाजारात हॉटेलचालक, छोटे व्यावसायिक हे पामतेल वापरतात, घरी वापरण्यासाठी नागरिक सोयाबीन तेलाला पसंती देतात. हिवाळ्यात थंडीमुळे पामतेल थिजत असल्याने सोयाबीन तेलाची मागणी असते. त्याचा परिणाम सोयाबीन तेलाच्या भाववाढीवर झाला आहे. सरकी तेल बाजारात आल्यानंतर भाव स्थिर राहतात. या वेळी मात्र परतीच्या पावसाने सोयाबीनचे झालेले नुकसान, सरकारने आयात तेलावरील ड्युतीत केलेली वाढ व मलेशिया सरकाने इंधन म्हणून वीस ऐवजी तीन टक्के पामतेल वापरास दिलेल्या परवानगीमुळे भाववाढ तेजीत झाली आहे.
हेही वाचा...नांदेड जिल्ह्यात ‘या’ प्राण्यांचा उन्माद
तेलावरील ‘जीएसटी’मुळे भाववाढ
सरकारकडून येत्या आठवड्यात तेलावरील जीएसटी दहा टक्क्यांपर्यंत घेण्याची शक्यता असल्याने ही तेजी आल्याचे जाणकार सांगत आहेत. महिनाभरापूर्वी किरकोळ बाजारात ८० ते ८२ रुपये दराने विकले जाणारे सोयाबीन तेल ९५ ते १०० रुपयांपर्यंत विकले जात आहे. तसेच ६८ ते ७० रुपये विक्री होणारे पामतेल ८५ ते ८८ रुपयांपर्यंत पोचले आहे.
भावात झाली अशी वाढ
दिवाळीला १५ किलो सोयाबीन तेलाचा डबा १२७५ ते १२८० रुपयांना होता. तो आता १४२५ ते १४४० रुपयांना झाला आहे. तर १५ किलोची सोयाबीनची कॅन १३२५ रुपयांवरून १५०० रुपयांना मिळत आहे. एक किलो तेलाचे पाऊच ८० ते ८२ रुपयांवरून ९२ ते ९५ रुपयांना मिळत आहे. तर पाच लिटर तेलाची कॅन ४३० रुपयांवरून ४६० ते ४७० रुपयांवर पोचली आहे.
पॅकींगच्या तेलाला मागणी जास्त
सध्या बाजारपेठेत तेल विकत घेताना अनेक ग्राहक पॅकींगच्या तेलाला पसंती देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.